आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगनचुंबी इमारती आणि गर्दीपासून दूर, 120 वर्षांपूर्वी अशी होती अमेरिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनहॅटनमधील मल्बेरी स्ट्रीट. - Divya Marathi
मॅनहॅटनमधील मल्बेरी स्ट्रीट.
इंटरनॅशनल डेस्क - हे फोटो सुमारे 120 जुन्या अमेरिकेचा आहे. उंच उंच इमारती आणि गर्दीपासून अगदी दूर असलेले हे फोटो अमेरिकेचे अगदी वेगळे रुप आपल्यासमोर सादर करतात. हे फोटो मिळवून 'अॅन अमेरिकन ओडिसी' नावाच्या पुस्तकारमध्ये एकत्रितपणे प्रकाशित करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे मूळ निवासी, आफ्रिकी अमेरिकन आणि काऊबॉयची झलक पाहायला मिळते.

हे फोटो 1888 आणि 1924 दरम्यान घेण्यात आलेले आहेत. त्या काळी या देशातील शहरे, निसर्ग सौंदर्य आणि दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या यो फोटोंना पोस्टकार्डचे रूप देण्यात आले आहे. हे सर्व फोटो ब्लॅक अँड व्हाइट होते. फोटोक्रोम प्रोसेसग्वनारे त्यापासून रंगीत फोटो तयार केले आहेत. हे शानदार पोस्टकार्ड ग्राफिक डिझायनर, फोटोग्राफर मार्क वॉल्टर यांच्या खासगी कलेक्शन मधील आहेत. विंटेज ट्रॅव्हल फोटोग्राफी ही त्यांची खासीयत आहे. त्यांच्याकडे फोटोचे जगातील सर्वात मोठे कलेक्शन आहे. डेट्रॉइट फोटोग्राफिक कंपनीने हे फोटो पब्लिश केले आहेत.

या फोटोंमध्ये न्यूयॉर्कच्या मल्बेरी स्ट्रीटपासून फ्लोरिडामधील व्हिलेज एरियादेखिल दाखवण्यात आले आहेत. यात त्याकाळच्या वाहतुकीच्या साधनांचाही समावेश करण्यात आला आहे. कोलोराडोमधील जॉर्जटाउन लूप आणि कॅलिफोर्नियाच्या सर्कुलर ब्रिजवर तयार करण्यात आलेल्या माऊंट लो रेल्वेचाही समावेश आहे. कोलोराडोमधील जॉर्जटाऊन लूपवर लोक आजही त्या काळचे जीवन अनुभवण्याचा प्रयत्न करतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 120 वर्षे जुन्या अमेरिकेचे काही PHOTOS