आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी कंपनीकडून भारतीय कामगारांना १२७ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - २०० भारतीय कामगारांना अमेरिकन कंपनीने कामासाठी नियुक्त केले होते. हुर्रीकेन कॅटरीनामुळे नुकसान झालेल्या तेल विहिरींच्या दुरुस्तीसाठी या भारतीय कामगारांना अमेरिकेत आणण्यात आले होते. मात्र कंपनीकडून आपल्यावर अन्याय झाला. तसेच शोषण झाल्याची तक्रार या कामगारांनी केली होती. या प्रकरणी कामगारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला असून त्यांना १२७ कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
अमेरिकन कंपनीविरुद्ध कामगार तस्करीचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण ठरले आहे. अमेरिकन न्यायालयाने अलबामा येथील कंपनीविरुद्ध निर्णय दिला. वेल्डिंग, पाइप फिटिंगसाठी या कामगारांना अमेरिकेत आणण्यात आले होते. कंपनीने कामगारांची जाहीर माफी मागितली आहे. वर्ष २००६ मध्ये या कामगारांना अमेरिकेत नेले होते.

१० हजार ते २० हजार अमेरिकन डॉलर्स वेतन, ग्रीन कार्ड, कुटुंबीयांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व या सुविधा करारात नमूद होत्या. मात्र कंपनीने याची पूर्तता केली नाही. शिवाय कामगारांना नागरिकत्व हक्कही प्रदान करण्यात आले नाहीत. अनेक कामगार बेघर झाल्याचे दिसून आले. कंपनीवर न्यायालयाने जबरदस्त दंडात्मक कारवाई करत त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला .
बातम्या आणखी आहेत...