आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तान : रेफ्युजींना घेऊन जाणाऱ्या बोटची जहाजाला धडक, 4 चिमुकल्यांसह 13 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - तुर्कस्तानच्या बंदराहून ग्रीसला जाणारी एक छोटीशी बोट दुस-या एका जहाजाला धडक्याने झालेल्या अपघातात 13 रेफ्युजिंचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी कनाकाले आयलँडजवळ झाला. तुर्कस्तानच्या मिडियानुसार मृतांमध्ये चा मुलांचाही समावेश आहे. बोटीमधून एकूण 46 जण प्रवास करत होते.

कोस्टगार्डने दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम तुर्कस्तानच्या किनाऱ्यावरून काहीजण ग्रीसच्या लेस्बोस आयलँडकडे जात होते. त्याचवेळी बोट आणि जहाजाची धडक झाली. आतापर्यंत 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 13 जण बेपत्ता आहेत. बोटमधून जाणारे कोणत्या देशाचे नागरिक आहेत, हे मात्र अद्याप समजलेले नाही.

धडकेच्या भितीने पाण्यामध्ये उड्या
हसन नावाच्या बचावलेल्या एका व्यक्तीने एएफपीला सांगितले की, प्रवास करताना खूप अंधार झालेला होता. एक जहाज आमच्याकडे येत असल्याचे आम्ही पाहीले. आम्ही सिग्नल देण्यासाठी फ्लॅशलाईट आणि मोबाईल सुरी केले. पण त्याने आण्हाला पाहिले नाही. अनेक प्रवाशांनी तर भितीपोटीच पाण्यात उड्या घेतल्या. आम्ही आमची मुलेही गमावली.

एक बोटही बेपत्ता
दरम्यान, दुस-या एका घटनेमध्ये लेस्बोसकडे जाणारी एक बोटही बेपत्ता झाली आहे. त्यात 26 जण प्रवास करत होते. कनाकालेच्या बेटाजवळ ही बोट एका जहाजाला धडकली. मात्र त्याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर शनिवारी एका पाच वर्षांच्या मुलीचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. या धोकादायक प्रवासात वर्षभरात शेकडो जणांनी प्राण गमावले आहेत.