आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 People Killed And More Than 20 Injured In A Suicide Bombing In Jalalabad

जलालाबाद: अफगाणी अधिकाऱ्याच्या घरावर आत्मघातकी हल्ला, 13 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलालाबाद - अफगाणिस्तान येथील जलालाबाद येथे आज झालेल्या आत्मघातकी स्फोटात 13 जण मृत्युमुखी पडले असून 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. हा स्फोट ननगरहर या भागातील प्रॉविन्शियल काउंसिलचे मेंबर ओबेदुल्लाह शिनवारी यांच्या घरावर झाला. टोलो वृत्तवाहिनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिीत दिली आहे.

आत्मघातकी हल्लेखोराने घरात घुसून केला स्फोट
- स्थानिक अधिकाऱ्यांनुसार, आत्मघातकी हल्लेखोराने काउंसिल मेंबरच्या घरात घुसून स्वतःला उडवले.
- ओबेदुल्लाह शिनवारी यांच्या घरात जेव्हा स्फोट झाला तेव्हा तेथे जल्लोष सुरू होता.
- शिनवारी यांच्या भावाच्या सुटकेबद्दल हा जल्लोष होता.
- शिनवारी यांचा भाऊ तालिबानच्या ९ महिन्याच्या तुरूंगवासातून सुटून घरी परतला होता.
- या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांमध्ये शिनवारी यांच्या वडीलांचा समावेश आहे.

चार दिवसापुर्वीच दुतावासाला बनवले होते लक्ष्य -
- जलालाबाद येथे चार दिवसांपूर्वीच आत्मघातकी हल्ल्याकरून पाकिस्तान कॉन्सलेट यांच्यावर निशाणा साधण्यात आला.
- दोन पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत अफगाणी फोर्सच्या सात सैनिकांचा यात मृत्यू झाला होता.
- या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयएसआयएसने घेतली होती.

3 जानेवारीला झाला होता हल्ला
- यापूर्वी 3 जानेवारीला भारतीय दुतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता.
- या हल्ल्याचा हेतू अफजल गुरूच्या मृत्यूचा बदला घेणे हा होता.
- चार दहशतवादी ठार होण्यापूर्वी दुतावासाच्या भिंतींवर रक्ताने घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
- एका घोषणेत लिहिले होते - 'अफजल गुरुचा बदला'
- तर दुसरी घोषणा होती - 'एक शहीद आणि हजार फिदायीन'
- 25 तास चाललेल्या या एन्काऊंटरनंतर सर्व चार दहशतवादी ठार करण्यात आले.
- या घटनेनंतर झालेल्या दोन मजली इमारतीच्या तपासणी दरम्यान भिंतींवर घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्या इमारतीतच दोन दहशतवादी लपलेले होते.


पुढील स्लाईडवर पाहा, या स्फोटाचे इतर विदारक Photos