आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियातील पुरात १३३ बळी, ३९५ बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियातील पुरामध्ये बळींची संख्या १३३ वर गेली असून ३९५ जण बेपत्ता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या अहवालानुसार यात जीवितासह मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले आहे. १ लाखपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. ट्युमेन नदीच्या परिसरातील अनेक इमारती वाहून गेल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चीन व रशियाच्या सीमेवरील या पुराचा तडाखा बसला आहे. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न स्वयंसेवी संस्था, रेड क्रॉस इत्यादी मदत कार्य करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...