आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

133 वर्षांनी लिस्टर सिटीला चॅम्पियन बनवणाऱ्या कोच क्लाउडिओला 9 महिन्यांनी केले बरखास्त!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एका फुटबॉल क्लबने गेल्या १३३ वर्षांच्या आपल्या इतिहासात एकदाही विजेतेपद जिंकले नव्हते. सट्टेबाजारात ही टीम चॅम्पियन बनल्यास एका पाउंडच्या बदल्याला ५००० पाउंडचा भाव सुरू होता. ज्या  संघातील सर्व खेळाडूंची एकूण किंमत इंग्लंडच्या एखाद्या मोठ्या क्लबच्या एका दिग्गज खेळाडूपेक्षा कमी होती, त्या क्लबला एका कोचने जर इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले असेल तर त्याची नोकरी किमान दोन,
 
तीन वर्षे निश्चित होऊ शकते. मात्र, लिस्टर सिटीला मागच्या वर्षी इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेता बनवणारे कोच क्लाउडिओ रेनिएरी यांना त्यांच्या ऐतिहासिक यशाच्या नऊ महिन्यांनी पदावरून दूर करण्यात आले आहे.  
 
इटलीच्या असलेल्या रेनिएरी यांनी मागच्या वर्षी लिस्टर सिटीला चॅम्पियन बनवले असले तरीही या वर्षी त्यांच्या टीमचे प्रदर्शन साधारण राहिलेले आहे. २० संघांच्या लीगमध्ये लिस्टर सध्या १६ व्या क्रमांकावर आहे. लिस्टरची टीम या तालिकेत आणखी एका स्थानाने खाली घसरली तर या संघाला रेलिगेट होऊन दुसऱ्या गटात जावे लागेल. लिस्टरने याबाबत प्रसिद्धिपत्रकातून माहिती दिली.  संघाचे प्रदर्शन चांगले झालेले नाही. यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला, असे लिस्टरने सांगितले.  
 
रेनिएरी यांना बरखास्त केल्यानंतर फुटबॉल जगतातून कठोर प्रतिक्रिया येत आहेत. कधी काळी लिस्टरचा स्टार असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार गॅरी लिनेकरने या निर्णयावर टीका केली. हा निर्णय चुकल्याचे त्याने म्हटले. लिनेकर म्हणाला,
 
“मी या निर्णयाबाबत ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. अनेक जण याला प्रोफेशनल निर्णय म्हणून शकतात. मात्र, माझ्या मते या निर्णयाने फुटबॉलच्या आत्म्यावर आघात झाला आहे.’  
 
मँचेस्टर युनायटेडचे कोच जोस मोरिन्हा यांनी तर लिनेकरच्या एक पाऊल पुढे जाऊन प्रतिक्रिया दिली. मोरिन्हा पत्रकार परिषदेत “सीआर (क्लाउडिओ रेनिएरी)’ लिहिलेले टी-शर्ट घालून आले.
बातम्या आणखी आहेत...