Home »International »Other Country» 14 Photos Mars Claim Aliens Exist, NASA And Alien Hunters

नासाचे हे PHOTOS दाखवून केले जातात दावे, मंगळावर राहतात एलियन

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 01:03 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - एलियनच्या अस्तित्वाबाबत तपास करणारे यूएफओ हंटर्स रोज नवनवीन दावे करतात. त्यापैकीच एक, नासाच्या छायाचित्रात मंगळ ग्रहावर जपानच्या कोफून एरा टॉम्बसारखे स्तूप दिसल्याचा दावा करण्यात आला. यूएफओ हंटर्सनुसार एकेकाळी एलियन्स मंगळावर राहत असल्याचा पुरावा आहे. त्यांचा दावा आहे, की युद्धानंतर एलियन्स पृथ्‍वीवर स्थायिक झाले. मात्र नासाने याला दुजोरा दिलेला नाही.
संशोधक काय म्हणतात?
नासा सुरुवातीपासून अशा कोणत्याही कथित शोध मान्य केलेला नाही. दुसरीकडे अनेक संशोधकांच्या म्हणण्‍यानुसार ही एक पेअरीडोलियाच्या रुपात ओळखली जाणारी एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे. यात डोळ्यांना परिचित वस्तू व आकाराचा भास होतो. दगडांच्या ढिगा-यात बूटांच्या आकाराची दिसणारी वस्तू दुसरा दगडही असू शकतो.

पूर्वीही करण्यात आले असे दावे
- यापूर्वीही क्युरियॉसिटी रोव्हरने पाठवलेल्या छायाचित्रांवरुन वेग-वेगळे दावे करण्‍यात आले.
- क्युरियॉसिटी रोव्हरने घेतलेल्या मंगळाच्या एका छायाचित्रात एलियन दिसल्याचा दावा करण्यात आला होता.
- युट्यूब युजर पॅरानॉर्ल क्रूसिबलचा दावा होता, की दगडाच्या कड्यासारखी दिसणारी छोटीशी वस्तू एलियन आहे.
- एका दशकापूर्वी चिलीच्या अटाकामा वाळवंटातून मिळालेला 6 इंचांचा अनोखा सापळा विशिष्‍ट प्रजातीचा असल्याचे सांगितले होते.
- यानंतर युट्यूब चॅनल Luxor2012UFO ने नासाच्या एका छायाचित्रात घराचा आकार दिसल्याचा दावा केला आहे.
- गेल्या काही दिवसांत एलियन हंटर्सने नासाच्या छायाचित्रांमध्‍ये मंगळवार महिला, लष्‍करी बंकर, एलियन हंटर - खेकडा, शवपेटी आणि इतर वस्तू दिसल्याचा दावा केला.
- नासा एलियन्सविषयी माहिती सामोर आणू इच्छित नाही, असा आरोप एलियन हंटर्सने केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एलियन हंटर्स ज्यावरून एलियन असल्याचे दावे करतात ते 14 फोटो...

Next Article

Recommended