आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Year Old Dallan Jennet Receives First 3 d Printed Nose In Us

अमेरिकेच्या 14 वर्षांच्या जेनेटला मिळाले 3-D प्रिंटेड नाक, प्रत्यारोपण होते अवघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरसह डलन जेनेट - Divya Marathi
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरसह डलन जेनेट
न्यूयॉर्क : डलन जेनेट या चौदा वर्षाच्या मुलाला थ्री डी प्रिंटेड नाक बसवण्‍यात आले. नाकाचे असे प्रत्यारोपण करणारा तो अमेरिकेतला पहिला रुग्ण ठरला आहे. गुरुवारी (ता.31) डॉक्टरांनी यशस्वीरित्या डलनवर नाकेचे प्रत्यारोपण केले. विजेच्या तारांवर पडल्याने जेनेटचे नाक जळाले होते. डॉक्टरांनी प्रत्यारोपणापूर्वी त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या.
काय घडले होते जेनेटबरोबर?
- जेनेट मार्शल आइसलँडचा रहिवाशी आहे.
- जेनेट नऊ वर्षांचा असताना तो विजेच्या तारांवर पडला होता. त्यावेळी तारांमध्‍ये उच्चदाबाने विजेचे वहन होत होते.
- यामुळे जेनेटला गंभीर इजा झाली होती.
अवघड होते नाकाचे प्रत्यारोपण
- तसे पाहिले तर नाकाची शस्त्रक्रिया सर्वसाधारण नाही. अद्यापही डॉक्टरांना पूर्ण काम करणारे शरीराचे अवयव बनवण्‍यास 100 टक्के यश मिळालेले नाही.
- अडचण ही आहे, की प्रत्यारोपणाच्या वेळी शरीरातील पेशींचे रिजेक्शन वाढते.
- फिजीशियन टल डॅगन यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्‍यात आली.
कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जेनेटचे नाक बनवले
- डॉक्टरांच्या चमूने थ्रीडी टेक्निकच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांसारखे नाक बनवण्‍याचे प्रयत्न केले आहे.
- सर्जिकल चमूने प्रत्यारोपणासाठी जेनेटच्या मांडीतून पेशी घेतली आणि त्यास थ्रीडी प्रिंटेड तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवले.
पुढील स्लाइड्सवर पाहा शस्त्रक्रियेनंतरची छायाचित्रे