आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Year Old Killed At Least 50 Kurd Fighter In Suicide Attack

ISIS चा सर्वात छोटा सुसाइड बॉम्बर, सिरियात 50 कुर्द तरुणांना उडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 वर्षीय आत्मघातकी हल्लेखोर उमर हदीद अल-मोहम्मदी - Divya Marathi
14 वर्षीय आत्मघातकी हल्लेखोर उमर हदीद अल-मोहम्मदी
बेरूत - ISIS ने दहशतवादी कारवायांसाठी किशोरवयीन मुलांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री ISIS ने एका 14 वर्षीय मुलाला उत्तर सिरियामध्ये आत्मघातकी हल्ल्यासाठी पाठवले होते. या हल्ल्यात ISIS विरोधात लढणार्‍या 50 हून अधिक कुर्दीश तरुणांचा मृत्यू झाला. हा हल्लेखोर स्फोटकांनी भरलेला ट्रक घेऊन हसाका जवळ असलेल्या आर्मी चेकपॉइंटमध्ये घुसला आणि त्याने स्फोट घडवला.

सिरिया-तुर्कस्तान सीमेवर रास अल-ऐन गावात हा हल्ला करण्यात आला. याठिकाणी कुर्दीश जवान इराकी लष्कराबरोबर दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहेत. लष्करातील सुत्रांनी मात्र या हल्ल्यात तीन कुर्दीश जवानांचा मृत्यू झाला असून चार जखमी असल्याचे सांगितले आहे. काही नागरिक जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे.

या मुलाचे नाव उमर हदीद अल-मोहम्मदी असल्याचे सांगण्यात आले आहे. संघटनेने जारी केलेल्या फोटोमध्ये हा तरुण हिरव्या रंगाचा आर्मीचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तसेच त्याच्याकडे रायफलही आहे. बोट उंचावून तो इस्लामिक सॅल्यूट करतानाही दिसत आहे. मिशन पूर्ण करण्यापूर्वीचा हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मिडियावर ISIS समर्थक उमर हदीद अल-मोहम्मदी शहीद झाला असल्याचे म्हणत आहेत. सोशल मिडियावर शेयरकरण्यात आलेल्या एका मॅसेजमध्ये लिहिले आहे की, 'खलीफा के इस शेर ने 50 काफिरों की हत्या की है, अल्लाह इसकी शहादत स्वीकार करे'

गेल्या महिन्यात तल्हा असमल हा 17 वर्षीय ब्रिटिश मुलगा सर्वात कमी वयाचा आत्मघातकी हल्लेखोर असल्याचे सांगितले जात होते. त्याने इराकमध्ये बैजी येथील एका रिफायनरीमध्ये स्फोट घडवून आणला होता. पश्चिम यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या या मुलाने 10 सैनिकांची हत्या केली होती. त्यानंतर संघटनेने अनस अल-शाम या 14 वर्षीय मुलाचा फोटोही शेयर केला होता. तो सिरियाच्या हामामध्ये आत्मघातकी हल्ला करताना ठार झाला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गेल्या महिन्यात ठार झालेल्या ISIS च्या किशोरवयीन हल्लेखोरांचे फोटो...