आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Died In Bomb Blast In Pakistan Near Polio Booth

पाकमधील पोलिआे केंद्राजवळ आत्मघातकी स्फोट, 15 जण ठार, 10 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानातील पोलिआे केंद्राजवळ बुधवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान १५ जण ठार, तर १० जखमी झाले. ही घटना क्वेट्टा शहरात घडली. मृतांमध्ये १२ पोलिस, १ निमलष्करी आणि २ नागरिकांचा समावेश आहे.

नैऋत्येकडील या शहरात घटनास्थळी मोठा स्फोट झाला व त्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जखमींना क्वेट्टातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. स्फोटानंतर पोलिस आणि बचावपथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिआे प्रतिबंधक मोहिमेच्या विरोधात देशात सुरू असलेल्या कामाचा बुधवारचा तिसरा दिवस होता. देशातील ५ वर्षांखालील २० लाखांहून अधिक मुलांना पोलिआेमुक्त करण्याचे लक्ष्य या माध्यमातून सरकारने ठेवले आहे. आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक निर्वासितांच्या मुलांना पोलिआेचा डोस पाजण्यात आला आहे. दरम्यान, स्फोटानंतर येथील पोलिआे पथकांना इतरत्र हलवण्यात आले आहे.

अफवेतून लक्ष्य
पाकिस्तानात दीर्घकाळापासून पोलिआे कार्यकर्त्यांना कट्टरवाद्यांकडून लक्ष्य केले जाते. त्यामागे काही अफवा कारणीभूत मानल्या जातात. मुस्लिमांच्या विरोधात कट आहे, अशी धारणा त्यामागे आहे. त्यातून हे हल्ले होत आहेत. त्यामुळे मोठी हानी टळली, असे सूत्रांनी सांगितले.

डब्ल्यूएचआेची निराशा
जगातून पोलिआेचे उच्चाटन करण्याचा निर्धार करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (हू) उद्दिष्टांना पाकिस्तानमध्ये म्हणावे तसे यश आलेले नाही. कारण अजूनही पाकिस्तानात पोलिआे ठाण मांडून बसलेला आहे. जगात केवळ दोन देशांत पोलिआेचे अस्तित्व आहे. त्यात पाकिस्तानचाही समावेश होताे.

३ अतिरेक्यांचा अफगानमध्ये खात्मा
जलालाबाद । पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील दूतावासाजवळ बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले. घटनेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याचबरोबर बाॅम्बस्फोटदेखील घडवून आणला. जलालाबादमध्ये ही घटना घडली. घटनेत अन्य ७ जण जखमी झाले, अशी माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते सेदीक सेदिक्की यांनी ट्विटरवरून दिली. उशिरापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. तालिबानसोबतच्या शांतता चर्चेत चार देशांनी सहभाग घेतला असून ही चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. चार देशांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, अमेरिका, चीन यांचा समावेश आहे.

तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जलालाबादमधील हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मृतांत दूतावासाच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. जखमींमध्ये तीन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी जलालाबादमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला होता.

व्हिसा घेण्यासाठी अतिरेकी रांगेत
नांगरहारचे राज्यपालाचे प्रवक्ते अताउल्ला खोगयानी म्हणाले, आत्मघाती हल्लेखोर पाकिस्तानचा व्हिसा घेण्यासाठी दुतावासाच्या रांगेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दहशतवाद्याने कंबरेला बांधलेली स्फोटके उडवली. त्याबरोबर झालेल्या स्फोटात त्याच्याजवळील सहा सुरक्षा जवानही ठार झाले.