आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमानच्या दोन बेटांवर १५०० पर्यटक वादळात अडकले, पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट ब्लेअर - अंदमानच्या नील व हॅवलॉक बेटांवर १५०० पर्यटक अडकून पडले आहेत. प्रदेशावर चक्रीवादळाचे सावट असून मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, चार जहाजांच्या साह्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पोर्ट ब्लेअरपासून ४० किलोमीटर ही दोन बेटे आहेत. या बेटांना सध्याच्या हंगामात १४०० पर्यटकांनी भेट दिली आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे वाहतुकीची साधने थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना पाेर्ट ब्लेअरला परतण्याची काहीही सुविधा राहिलेली नाही, असे दक्षिण अंदमानचे उपायुक्त उदित प्रकाश राय यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहू लागले आहे. दोन बेटांवर दहा गावे आहेत. चक्रीवादळाचा फटका या गावांनाही बसला आहे.

सध्या चक्रीवादळाची शक्यता असल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरातील वातावरणविषयक बदलामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या अगोदरच ‘एल-१ डिझास्टर’ अशी चक्रीवादळाचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रदेशातील मोबाइल तसेच संपर्काची इतर यंत्रणाही कोलमडून पडली आहे. नायब राज्यपाल जगदीश मुखी यांच्या निवासस्थानी या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नायब राज्यपालांनी अशा परिस्थितीत सर्व विभागांनी पीडितांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी तत्पर राहावे, अशी सूचना केली आहे. पर्यटन विभागाच्या वतीने पोर्ट ब्लेअर विमानतळावर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

‘नील व हॅवलॉक’ला पर्यटकांचे आकर्षण
नील व हॅवलॉक ही पर्यटकांची आकर्षणाची केंद्रे आहेत. अंदमानात ही बेटे अाहेत. या बेटांशी संपर्काचे मुख्य साधन म्हणजे जहाज व विमान होय. परंतु गेल्या सोमवारपासून खराब हवामानामुळे संपर्काची साधने थांबवण्यात आली आहेत.

मदतकार्यात अडथळा
बेटांवर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या नौदलाच्या बित्रा, बांगाराम, कुंभीर, एलसीयू-३८ या जहाजांची मदत घेण्यात येणार आहे. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत बचाव पथकाला आपल्या कामास सुरुवात करता आली नव्हती. खराब हवामान असल्यामुळे जहाजांना स्वच्छ हवामानाची प्रतीक्षा आहे. जहाजावरून स्वच्छ पाणी, आैषधी, डॉक्टरांचे पथकही नेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...