आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्‍तपूरच्या प्रत्येक घरात मृत्यूचे तांडव, 25 जणांच्या कुटुंबाने 16 गमावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्तपूरमधील शव. - Divya Marathi
भक्तपूरमधील शव.
भक्‍तपूर (नेपाळ) हून राजेश कुमार ओझा
नेपाळमध्ये आलेल्या भुकंपानंतर चार दिवस उलटून गेले आहेत. पण काठमांडूमध्ये अद्याप जवजीवन सुरळीत झालेले नाही. अजूनही याठिकाणी मृतदेह सापडणे सुरुच आहे. नातेवाईकांच्या शोधासाठी लोक सारखे ढिगारे उपसत आहेत. काठमांडूपासून पाच किमी अंतरावरील भक्तपूरमध्ये एक अशी कॉलनी आहे, ज्याठिकाणी आतापर्यंत 250 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. येथे राहणाऱ्या सुमारे 100 कुटुंबापैकी प्रत्येक कुटुंबातील एका तरी सदस्याचा मृत्यू झाला आहे. याच कॉलनीतील आगुम प्रजापती यांच्या कुटुंबातील 25 सदस्यांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 15 मृतदेहही मिळाले आहेत. पण एक सदस्य अजूनही बेपत्ता आहे. त्यामुळे तो जिवंत अशण्याच्या आशा कुटुंबीयांना आहेत.

लग्नानंतर प्रथमच आलेले मुलगी आणि जावईही ठार
आगुम प्रजापतीचे कुटुंब भक्तपूर कॉलनीत राहत होते. शनिवारी त्यांची मुलगी काशी प्रजापती आणि जावई हेल प्रजापती हे लग्नानंतर प्रथमच घरी आले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण होते. शनिवारी आलेल्या भूकंपानंतर झालेल्या हानीत त्यांची मुलगी आणि जावई दोघे मारले गेले.

भक्तपूरमध्ये अशा प्रकारे दुःख सोसणाऱ्यांमध्ये केवळ आगुम प्रजापती यांचेच कुटुंब नाही. तर येथील प्रत्येक कुटुंबामधील एक तरी व्यक्ती या भूकंपामध्ये गमावला आहे. जे वाचले आहेत, त्यांनी हजारो वर्षे जुन्या मंदिरांचा सहारा घेतला आहे. विषेश म्हणजे या ऐतिहासिक मंदिरांना भूकंपात काहीही हानी झालेली नाही. भक्‍तपूरची 80 टक्के घरे उध्वस्त झाली आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भूकंपानंतर काठमांडूच्या भक्तपूर कॉलनीचे काही Photo