आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

16 वर्षीय मुलीला संतप्त जमावाने अमानूष मारहाण करून जिवंत जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो ब्रावो (ग्वाटेमाला)- उत्तर अमेरिकेत एका 16 वर्षाय मुलीला संतप्त जमावाने अमानूष मारहाण करून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कथित घटना ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीपासून जवळच असलेली रियो ब्रावो गावात घडली आहे.

'यूट्यूब'वर या भयावह घटनेचा व्हिडीओ अपलोड करण्‍यात आला होता. सध्या हा व्हिडिओ साइटवरून काढून टाकण्यात आला असला तरी तो हजारो युजर्सनी पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ही घटना कधी घडली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलिस प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, मृत मुलगी एक बाइकर गॅंगची सदस्य होती. तिने 68 वर्षीय टॅक्सी ड्रायव्हर कार्लेस एनरीक गोन्जालेज नॉर्जियालाची फसवणूक करून त्याची निर्घृण हत्या केल्याचा आरोप होता. टॅक्सी ड्राव्हरची हत्या केल्यानंतर पळून जाताना ही मुलगी जमावाच्या हाती लागली. संतप्त जमावाने अाधी तिला अमानूष मारहाण केली आणि तिला जिवंत जाळले.
पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला असता संतप्त जमावाने त्यांना रोखल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...