आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अमेरिकेच्या टेक्सासमध्‍ये पूरामुळे निर्माण झाली बिकट परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन - अमेरिकेच्या टेक्सास आणि ओक्लाहामामध्‍ये मुसळधार पाऊस आणि वादळाच्या कारणामुळे 17 लोकांचा मृत्यू झाला. यातील चार जण ह्यूस्टनमधील आहे. पूरामुळे रस्त्यांचे नद्यांमध्‍ये रुपांतर झाले आहे. जवळ-जवळ एक हजार लोक पाण्‍यात फसले आहेत. आतापर्यंत 40 लोक बेपत्ता झाले असून चार हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एकट्या ह्यूस्टनमध्‍ये दीड हजार गाड्या वाहून गेल्या आहेत. टेक्सासमध्‍ये वादळामुळे शेकडो घरे उद्ध्‍वस्त झाली. अनेक लोक बेपत्ता झाली आहे.
ओक्लाहामाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वादळ आणि मुसळधार पावसाने सहा लोकांचा बळी घेतला आहे. ह्युस्टन फायरफायटर्स विभागाने 500 लोकांना नावेच्या मदतीने सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. 200 पेक्षा जास्त विमान सेवा रद्द करण्‍यात आल्या आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेतील पूरामुळे झालेली बिकट परिस्थिती...