आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जकार्ता : ISIS ने केले 8 बाॅम्बस्फाेट, 17 ठार, 5 दहशतवाद्यांनाही मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता गुरुवारी दहशतवादी हल्ल्याने हादरून गेली. मोटारसायकलवर आलेल्या सुमारे १४ हल्लेखोरांनी गोळीबार केला. ग्रेनेड फेकले आणि सुमारे आठ ठिकाणी मोठे धमाके केले. या धमाक्यांमध्ये १७ जण ठार झाले आहेत. त्यात पाच हल्लेखोर आणि सात पोलिसांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकही आहेत. इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

राष्ट्रपती भवन आणि अमेरिकी दूतावासाजवळ दहशतवादी आणि सुरक्षा दलांत धुमश्चक्री झाल्याने हे परिसर युद्धभूमीच बनले होते. पाच तासांच्या संघर्षानंतर जकार्ता पोलिसांचे प्रवक्ते कर्नल मुहम्मद इक्बाल यांनी थमरीना मार्गावरील सरीनाह शॉपिंग मॉल सुरक्षित जाहीर केला. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते अँटन चेरिलयान म्हणाले, हल्लेखोर बंदुका व ग्रेनेड घेऊन आले. ते किती होते हे माहीत नव्हते. पॅरिससारखाच त्यांनी हल्ला घडवला. इंडोनेशियात इसिस कंसर्ट करू शकते, अशी माहिती नोव्हेंबरमध्ये मिळाली होती. कंसर्ट म्हणजे दहशतवादी हल्ला. त्यामुळे इंडोनेशियात कडक सुरक्षा होती.

आत्मघातकी हल्लेखोर असल्यावरून दावे-प्रतिदावे
जकार्तामधील एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, त्याने पाच हल्लेखोरांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यापैकी तिघांनी स्टारबक्समध्ये स्फोट घडवले. हल्लेखोरांनी स्फोटकांनी स्वत:ला उडवून दिले. मात्र पोलिसांचे प्रवक्ते चेरिलयान यांनी कोणीही आत्मघातकी हल्लेखोर नव्हते, असे म्हटले आहे.

घाबरू नका, आम्ही त्यांचा नायनाट करू : जोको विडोडो
हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो पश्चिम जावातील सिरेबोन शहरात होते. लोकांनी अजिबात घाबरू नये. आम्ही अशा दहशतवादी कारवायांचा नायनाट करून टाक, असे ते म्हणाले. इंडोनेशियामध्ये आपण विस्तार करणार असल्याचे इसीसने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

२००९ नंतर इंडोनेशियात पहिलाच मोठा हल्ला
इंडोनेशियात २००९ नंतर हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला आहे. त्या वेळी दोन मठ्या हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० जण ठार झाले होते. त्यापूर्वी २००२ मध्ये एका नाइट क्लबवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २०२ लोक ठार झाले होते. मृतांत बहुतांश परदेशी नागरिक होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS