आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येमेन : संघर्ष सुरूच, १८५ ठार, अदेनवर नियंत्रणाचा प्रयत्न ; हिंसाचारात १ हजारावर लोक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अदेन - येमेनमधील हिंसाचार वाढत चालला असून अदेन शहर ताब्यात ठेवण्यासाठी बंडखोर आणि सुरक्षा यंत्रणेत झालेल्या धुमश्चक्रीत १८५ जण ठार झाले. संघर्षात १ हजार २०० जण जखमी झाले असून त्यात नागरिकांचाही समावेश आहे.
बंदराचे शहर असलेल्या अदेनवर बंडखोरांनी चढाई केली आहे. त्यांचा खात्मा करण्यासाठी सरकारी फौजांनी मोहीम उघडली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार, बॉम्बफेक झाली. त्यात १८२ जणांना प्राण गमावावे लागले. २६ मार्चपासून हा संघर्ष सुरू आहे. गृहयुद्धामध्ये सौदी अरेबियाने उडी घेतली. सरकारचा पाडाव होऊ नये म्हणून सौदीने हवाई कारवाई केली.
हल्ले थांबवणार
मानवी पातळीवर हवाई हल्ले थांबवण्याच्या रशियाच्या प्रस्तावावर शनिवारी उशिरा संयुक्त राष्ट्राच्या वतीने प्रयत्न सुरू झाले. रशियाने १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली आहे.
५१९ जण ठार
संयुक्त राष्ट्राकडून देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून देशात दोन आठवड्यांत ५१९ जण ठार, तर १ हजार ७०० जण जखमी झाले. आतापर्यंत हिंसाचारात ६२ मुलांचा मृत्यू झाला आहे.
३३४ मायदेशी
गुरुवारी रात्री येमेनहून आणखी ३३४ भारतीय मायदेशी दाखल झाले. भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांनी त्यांचे येथे आगमन झाले. त्यात ४६ जण नंतर चेन्नईला पाेहोचले.