आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्ये आकाशातच धडकले दोन एयरक्राफ्ट, भारतीय वंशाच्या दोघांसह 4 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जसपाल बाहरा - Divya Marathi
जसपाल बाहरा

लंडन - साउथ-ईस्ट इंग्लंडमध्ये एका हवाई अपघातात भारतीय वंशाच्या दोन जणांसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइट एयरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरमध्ये हवेतच ही धडक झाली. यात बकिंघमशायर न्यू यूनिव्हर्सिटीत एयरोनॉटिक्सचा विद्यार्थी सावन मुंडे (18) आणि जसपाल बाहरा (27) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तेथील स्थानिक वेळेनुसार 17 नोव्हेंबरची आहे. 

 

कमर्शियल पायलट बनण्याचे स्वप्न भंगले
सावन कमर्शियल पायलट बनण्याचे स्वप्न घेऊन एयरोनॉटिक्सचे शिक्षण घेत होता. अपघाताच्या वेळी तो प्रशिक्षक बाहरा यांच्यासोबत होता. त्यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर दोघांची नावे मायकल ग्रीन (74) आणि व्हिएतनामचे थान नुयेन (32) अशी आहेत. त्यांचे विमान एका मैदानात कोसळले.

बातम्या आणखी आहेत...