आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Indian Seema Surakshya Bal Personnel Arrested And Indian TV Channels Banned In Nepal

नेपाळने केली भारताच्‍या दोन जवानांना अटक, 42 भारतीय TV चॅनलही बॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये भारतविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्‍यातम येत आहे. - Divya Marathi
नेपाळमध्ये भारतविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्‍यातम येत आहे.
काठमांडू - नेपाळच्‍या सीमेत शस्‍त्र घेऊन घुसलेल्‍या भारतीय सशस्त्र सीमा बलाच्‍या (एसएसबी) दोन जवानांना आज (रविवार) नेपाळ पोलिसांनी अटक केली. दरम्‍यान, 42 भारतीय वाहिन्‍यांना नेपाळमध्‍ये बंदी घालण्‍यात आली असून, काठमांडू शहरातील थिएटर्समध्‍ये भारतीय चित्रपटांचे शोसुद्धा थांबवण्‍यात आलेत.
का गेले भारतीय जवान नेपाळमध्‍ये ?
- नेपाळ पोलिसांनी एसएसबीच्‍या दोन जवानांना अटक केली. दरम्‍यान, 'कांतिपूर टाइम्स' या नेपाळी वृत्‍तपत्राने दावा केला की, भारताच्‍या 13 जवानांना नेपाळी पोलिसांनी अटक केली.
- आमचे जवान तस्‍करांचा पाठलग करत असताना सीमेपलीकडे गेले, असे एसएसबीच्‍या सूत्रांनी सांगितले. या जवानांना नेपालच्‍या आर्म्ड पोलिस फोर्स शिबिरात ठेवले गेले आहे.
- या बाबत झापाचे जिल्‍हाधिकारी तेज प्रसाद पौडेल म्‍हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
42 भारतीय वाहिन्‍या ब्लॉक
दुसरीकडे नेपाळ सरकारने केबल टीव्‍ही ऑपरेटर्सच्‍या माध्‍यमातून 42 भारतीय वाहिन्‍यांना ब्लॉक केले आहे. भारतातून नेपाळमध्‍ये आणले जात असलेले सामान भारत सीमेवर थांबवत आहे. याचा निषेध म्‍हणून आम्‍ही भारतीय चैनल्स ब्‍लॉक केले आहेत, अशी माहिती टीव्‍ही ऑपरेटर्संनी दिली.
यामुळे उचचले पाऊल
- नेपाळमधील माजी माओवादी नेत्‍यांनी भारतीय चित्रपट आणि टीव्‍ही चॅनल विरोधा कॅपेन सुरू केल्‍यानंतर 42 भारतीय वाहिन्‍या ब्लॉक करण्‍यात आल्‍या.
- नेपाळ केबल टेलीव्‍हीजन असोसिएशनचे अध्‍यक्ष सुधीर पाराजुली म्‍हणाले, ''ही बंदी अनिश्चित काळासाठी आहे. भारताने नेपाळच्‍या सार्वभौमत्वात घुसखोरी केली आहे. त्‍यामुळे आम्‍ही भारतीय चॅनल्सचे ब्रॉडकास्टिंग बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
- काठमांडूच्‍या थिएटर्समध्‍येही दोन दिवसांपासून भारतीय चित्रपट दाखवणे बंद करण्‍यात आले.