आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये २ लाख भारतीय विद्यार्थी ! विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकीकडे कल, चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याकडे आेढा आहे. त्यामुळे अमेरिकेतील विविध विद्यापीठांत सुमारे २ लाख ६ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

परदेशी विद्यार्थ्यांची अमेरिकेतील एकूण संख्या १.२३ दशलक्ष एवढी आहे. त्यात भारताचे २ लाख ६ हजार ५८२ विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षण घेत आहेत. चीनची विद्यार्थी संख्या भारताहून अधिक आहे. चीनचे ३ लाख ७८ हजार ९८६ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. नोव्हेंबर २०१५ पासून हे विद्यार्थी अमेरिकेत आहेत. परंतु चीनच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांचे या कालावधीतील संख्यावाढीचे १४.१ टक्के जास्त प्रमाण आहे, अशी माहिती अमेरिकेच्या स्थलांतर व अंमलबजावणी विभागाच्या वतीने (आयसीई) गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित विषयाकडे या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे.

सौदीचीही पसंती
अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या आशियातील देशांत सौदी अरेबियाचाही क्रमांक आता वरचा लागतो. म्हणूनच सौदीतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढल्याचे चालू शैक्षणिक वर्षात दिसून आले आहे. सध्या सौदीतील ६२ हजार ७७ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचे १ हजार २८८ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. कनेक्टिकट, मॅसाच्युसेट, व्हर्जिनियादेखील विशिष्ट क्षेत्रातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचा आेढा असल्याचे दिसून आले आहे.

कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सासमध्ये अध्ययन
परदेशी विद्यार्थी कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सासमधील विविध विद्यापीठे तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पसंती देतात. या सर्व प्रांतांत जागतिक दर्जाच्या संस्था आहेत.
बातम्या आणखी आहेत...