आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 20% संसद सदस्य, महापौर महिला; इतर क्षेत्रांत पिछाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्कोच्या मध्यवर्ती परिसरात २२ इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची स्मारके आहेत. यात एकही महिला नाही. गोल्डन गेट पार्कमध्ये केवळ एका महिलेचा पुतळा आहे. संपूर्ण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ८७ पुतळे आहेत. यात २ महिलांचे आहेत. सिनेटर डाएन फेन्सटिन आणि फ्लोरेन्स नाइंटिगेलचा पुतळा येथे आहे. उदारमतवादी विचारसरणीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या शहराची ही परिस्थिती आहे.  

देशातील पुतळ्यांवरून होणाऱ्या राजकारणादरम्यान सॅन फ्रान्सिस्कोच्या सल्लागार मंडळाने शहर पर्यवेक्षक मार्क फेरेल यांना एका प्रस्तावावर राजी केले. यात शहरातील रस्त्यांची नावे, पुतळे, सार्वजनिक कलाकृती व सरकारी आयोगांमध्ये महिलांची संख्या २०२० पर्यंत ३०% करण्याची तरतूद आहे. प्रस्ताव संमत झाल्यास महिलांची ३०% भागीदारी करण्याच्या जागतिक आंदोलनात सामील झालेले हे पहिले अमेरिकी शहर ठरेल. शॅरलट्सव्हिलमध्ये रॉबर्ट ई ली यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर हिंसा झाली. या लोकांचे प्रतिनिधित्व वाढावे असा सूरही एका गटाने आळवला.  

अमेरिकी संसदेत २०% महिला आहेत. देशाच्या २०% शहरांच्या महापौर महिला आहेत. २४% निर्वाचित पदांवर त्या कार्यरत आहेत. मात्र आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ५% मध्येच महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत. पब्लिक आर्ट क्षेत्रात त्या आणखीच पिछाडीवर आहेत. स्मिथसोनियन अमेरिकी आर्ट म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये  ६९०० नावांची नोंद आहे. यात केवळ ९ महिलांची नावे आहेत. देशात ४११ राष्ट्रीय उद्याने आहेत. पैकी ९ उद्यानांना महिलेचे नाव आहे. अमेरिकी राष्ट्र आणि समाज उभारणीत महिलांची खास भूमिका नसल्याचे यावरून सिद्ध होते.  

महिलांसाठी स्मारकांच्या कमतरतेचा मुद्दा दशकांपासून चर्चेचा ठरला आहे. तरीही या दिशेने मंदगतीने प्रगती होत आहे. ९ वर्षे चाललेल्या अभियानानंतर १९९३ मध्ये व्हिएतनाम वुमन्स मेमोरियलची सुरुवात वॉशिंग्टनमध्ये झाली. २००९ मध्ये अलबामाने हेलेन केलरचा पुतळा उभारला. २०१३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी नागरी हक्क कार्यकर्ता रोझा पार्क्सच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. इतक्या प्रयत्नांनंतर महिलांचे १२ पुतळे आहेत. न्यूयॉर्क सिटी, लॉस एंजलिस, शिकागोसारख्या शहरांमध्येदेखील महिलांच्या मोजक्या प्रतिमा आहेत. मात्र आता यात बदल घडत आहेत. वॉशिंग्टन डीसीच्या सिटी कौन्सिलमध्ये जूनमध्ये एक कायदा झाला. याअंतर्गत शहरातील ८ वॉर्डांत महिला किंवा कृष्णवर्णीयाचा पुतळा लावण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेच्या इतिहासात महिलांची भूमिका नव्या दृष्टिकोनाचा पेरा करेल. त्यांच्या कार्याला नव्या पद्धतीने सादर केले जात आहे. या दिशेने माजी कोशागार अधिकारी रोझी रिआेस यांनी चलनावर महिलेचे छायाचित्र लावण्याचे अभियान हाती घेतले होते. त्यांनी टीचर्स रायटिंग हिस्ट्री प्रकल्प सुरू केला होता.
बातम्या आणखी आहेत...