आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियातील 20 हजार भारतीय परतणार मायदेशी, सौदी सरकारचा \'राजमाफी\'चा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली-  सौदी अरेबियामधील तब्‍ब्‍ल 20 हजार भारतीय कामगार लवकरच मायदेशी परतणार आहेत. व्हिसा संपूनही हे कामगार सौदी अरेबियामध्‍येच राहत होते. अशा कामगारांवर कोणतीही कारवाई न करण्‍याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. 
 
सौदी सरकारने दिली तीन महिन्‍यांची मूदत
सौदी अरेबियातील सरकारने भारतीयांना 'राजमाफी' दिली आहे. यानूसार व्हिसा संपलेल्‍या भारतीयांवर कोणतीही कारवाई न करता देश सोडण्‍यासाठी त्‍यांना तीन महिन्‍यांची मूदत देण्‍यात आली आहे. मायदेशी सहज परतता यावे म्‍हणून भारतीयांच्‍या सोयीसाठी सौदी सरकारने विशेष केंद्राची निर्मिती केली आहे. यामध्‍ये भारतीयांना अर्ज करता येणार आहे. या केंद्रामध्‍ये आतापर्यंत 20 हजार 231 भारतीयांनी अर्ज दाखल केले आहेत. 'राजमाफी' दिल्‍याबद्दल भारतीयांनी सौदी सरकारचे आभार मानले आहेत.  
 
 
बातम्या आणखी आहेत...