आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1667 नंतर पहिल्यांदाच 20 वर्षांची तरुणी गेली ब्रिटनच्या संसदेत, दिग्गजाला केले पराभुत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- मजूर पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते डग्लस अलेक्‍झांडर या दिग्गज राजकारण्याचा पराभव करुन वयाच्या केवळ 20 व्या वर्षी मॅरी ब्लॅक ब्रिटनच्या संसदेत निवडून गेली आहे. 17 व्या शतकापासून ब्रिटनच्या संसदेवर निवडून जाणारी ती पहिली सर्वांत कमी वयाची लोकप्रतिनिधी ठरली आहे. ग्लास्गो विद्यापिठातील ती पॉलिटिक्सची विद्यार्थीनी असून डिझर्टेशन पूर्ण केल्यावर सभागृहात जाणार आहे.
मॅरी ब्लॅक हिने तब्बल 16,000 पेक्षा जास्त मतांनी डग्लस अलेक्‍झांडर यांचा पराभव केला आहे. त्यांना केवळ शॉडो परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखले जात नव्हते तर त्यांच्या पाठीशी निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे.
ब्रिटनच्या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. मॅरी ब्लॅक ही स्कॉटिश नॅशनल पार्टीची सदस्य आहे. या पक्षाने ब्रिटनच्या निवडणुकांवर पकड मजबूत केली आहे. या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्टायलिश आहे मॅरी ब्लॅक... राहते एका गावात...