आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियाच्या हल्ल्यात २०० ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना - सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील फौजांनी हवाई आणि जमिनीवरून केलेल्या हल्ल्यात येमेनमध्ये २०० जण ठार झाले. सोमवारच्या या हल्ल्यात १७६ बंडखोरांचा समावेश आहे.
बंडखोरांकडून संचलित केलेल्या प्रसारमाध्यमाने ही माहिती दिली. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान एका दिवसात मरणा-यांची ही सर्वाधिक संख्या आहे. संयुक्त राष्ट्र हवाई हल्ले थोपवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, २६ मार्चपासून मैदानी कारवाई वेगवान करण्यात आल्या आहेत. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत.सोमवारी उत्तरेतील अमरान प्रांतातील हल्ल्यात ६३ ठार झाले होते. यामध्ये ३० बाजारात खरेदी करत होते.

या राज्यातील अमरान शहरात हाऊती तपास नाक्यावर २० बंडखोर मारले गेले. दक्षिणेच्या अल फोयूशमध्ये एका जनावरांच्या बाजारात झालेल्या हल्ल्यात ६० जण ठार झाले. अदन आणि लाज शहरांदरम्यान एक हाऊती तपासनाक्यावर ३० जण ठार झाले. यात १० हाऊती बंडखोरांचा समावेश होता.

येमेनमध्ये संघर्षाचे स्वरूप :
भ्रष्ट सरकारविरुद्ध लढत असल्याचे हाऊती बंडखोरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे हाऊतीच्या ताब्यातील जमीन परत मिळवण्यासाठी त्यांच्याशी लढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. येमेनला वाचवण्यासाठी हाऊती बंडखोरांवर हल्ले करत असल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.