आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैविक घड्याळ विश्लेषक तिघा अमेरिकींना नोबेल; आज भौतिकशास्त्राच्या पुरस्काराची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम- २०१७ च्या नोबेल पुरुस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. सोमवारी सर्वांत प्रथम वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलची घोषणा स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल अमेरिकी शास्त्रज्ञ जेफ्रे सी. हॉल, मायकेल रोसबाश व मायकेल डब्ल्यू यंग यांना जाहीर झाला.

कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल पुरस्कार समितीने सांगितले की, या तिघांनी माणसाची झोप व जागण्याची प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या बायोलॉजिकल क्लॉकवर(जैविक घड्याळ) संशोधन केले आहे. साडेनऊ लाख युरोचा(७ कोटी ३१ लाख रुपये) पुरस्कार तिघांत विभागून दिला जाईल.
यादरम्यान एक अनोखा योगायोग घडला. तिघांपैकी एका शास्त्रज्ञाला पुरस्कार मिळत असल्याची कल्पनाही नव्हती. सर्वसाधारणपणे नोबेल पुरस्कार समिती सर्व विजेत्यांशी काही दिवस आधी संपर्क करत असते. नोबेल समितीचे दिला जाईल. यादरम्यान एक अनोखा योगायोग घडला. तिघांपैकी एका शास्त्रज्ञाला पुरस्कार मिळत असल्याची कल्पनाही नव्हती. सर्वसाधारणपणे नोबेल पुरस्कार समिती सर्व विजेत्यांशी काही दिवस आधी संपर्क करत असते. नोबेल समितीचे प्रमुख थॉमस पर्लमन म्हणाले,  याबाबत त्यांनी जेफ्री हॉल व मायकेल रोसबॅश यांच्याशी संपर्क केला होता. मात्र, मायकेल यंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याआधी २०१६ मध्ये जपानचे शास्त्रज्ञ योशीनोरी ओहसुमी यांना पेशींच्या रिसायकलिंग विज्ञानाच्या अभ्यासासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. मंगळवारी भौतिकशास्त्रचा नोबेल पुरस्कार व शुक्रवारी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होईल.
बातम्या आणखी आहेत...