आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी.. 2100 फूट खोल खाणीत उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण चिलीमध्ये कुरानिलाहू येथील सांता अॅना कोळसा खाणीत ६० कर्मचारी  २,१०० फूट खोलीवर उपोषणास बसले आहेत. २०१५ मध्ये खाणमालकाचे दिवाळे निघाले असल्यामुळे सरकारने ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खाणकामगारांच्या मते, ही खाण बंद झाली तर इथे काम करणाऱ्या २,५०० मजुरांची कुटुंबे उघड्यावर येतील. सरकार जोपर्यंत यावर सकारात्मक तोडगा काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे मजुरांनी सांगितले. मॉरिको मेडेल हे छायाचित्रकार या मजुरांपर्यंत पोहोचले तेव्हा जागतिक माध्यमांचे लक्ष याकडे वेधले गेले.
 
- या ६० खाणकामगारांपर्यंत जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री त्यांच्या साथीदारांद्वारे पोहोचवली जात आहे. ही जगातील सर्वात मोठी कोळसा-तांब्याच्या खाणींपैकी एक आहे.
-wsws.org