आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१२ किलोचा मासा, ४.१७ कोटी रु. लिलाव, किंमत जास्त मिळाल्यास व्यवसायासाठी मानले जाते शुभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जर तुम्हाला मासा खाण्याची आवड असेल तर टूना मासा हे नाव तुम्ही नक्कीच एेकले असेल. खाद्यपदार्थांच्या डिशमध्ये हा सर्वात महागडा  मासा असल्याचे मानले जाते. जपानी नागरिक विशेषकरून त्यांचे आवडते जेवण सुशीमध्ये हा मासा वापरतात. जपानची राजधानी टोकियोमध्ये गुरुवारी टूना माशांचा लिलाव झाला. यात सर्वात मोठा मासा २१२ किलोचा होता. म्हणजेच जाडजूड माणसाच्या शरीराएवढा लांब. या ब्लूफिन टूना माशाचा ६,१४,००० डॉलर म्हणजेच ४.१७ कोटी रुपयांत लिलाव झाला. प्रति किलोच्या दृष्टीने विचार केल्यास हा मासा १.९७ लाख रुपये प्रति किलो विक्री झाला.
  
हा लिलाव टोकियोमधील सुकीजी फिश मार्केटमध्ये झाला. हा जगातील सर्वात मोठा माशांचा बाजार आहे. येथे नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी अशी लिलाव प्रक्रिया पार पडते. यामध्ये लिलाव प्रक्रियेत जेवढी जास्त बोली लागली, त्या वर्षभरात तेवढा चांगला व्यवसाय हाेईल, असे मानले जाते.
  
प्रशांत महासागरात मिळणारा हा ब्लूफिन टूना मासा जपानमध्ये खूपच आवडीने खाल्ला जातो. यालाच तेथे ‘किंग ऑफ सुशी’ असेदेखील संबोधले जाते. सुशी जपानमधील एक प्रसिद्ध डिश आहे. ही डिश तांदूळ, सी फूड, फळ आणि भाज्यांपासून बनवली जाते. अलीकडच्या काळात ही डिश भारतासह इतर देशांमध्येही लोकप्रिय झाली आहे. या डिशमधून ब्लूफिन टूना मासा वापरण्याचे प्रमाणही तेजीने कमी होत आहे. अनेक वर्षांपूर्वीची तुलना केल्यास या माशाचा वापर फक्त २.६ टक्के राहिला असल्याचा दावा याच वर्षी जुलै महिन्यात करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालात करण्यात आला आहे. संशोधकांनी लावलेल्या अंदाजापेक्षा हा मासा पकडण्याचे प्रमाण वास्तवात तिप्पट जास्त होते. त्यामुळे या माशांची संख्या अत्यल्प राहिली आहे. पिऊ व इतर काही पर्यावरणवादी संघटनांनी हा मासा पकडण्यास बंदी घालण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली आहे.  

किमुराने खरेदी केला मासा  
या टूना माशाला सुशी जनमाई रेस्तराँ चेन चालवणाऱ्या कियोशी किमुरा यांनी खरेदी केले आहे. किमुरा गेल्या सहा वर्षांपासून सलग लिलाव प्रक्रियेत विजेता राहत आहेत. २०१३ मध्ये त्यांनी एक मासा ८.३ कोटी रुपयांत खरेदी केला होता. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...