आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची जिद्द : 23 आठवड्यांचा गर्भ; डॉक्टर म्हणाले, हे मूल वाचणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या डिबोरा जॅक्सन यांना २३ आठवड्यांचा गर्भ होता. तब्येत बिघडली तेव्हा पतीने रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की मूल प्रिमॅच्युअर आहे, वाचणार नाही, गर्भपात करून घ्या. डिबोराने डॉक्टरांचा सल्ला मानण्यास नकार दिला. मी मुलाला जन्म देणार असे ती म्हणाली.

डिबोराला जुळी मुले झाली. एका मुलाचा जन्मानंतर एक तासातच मृत्यू झाला. त्याचे वजन होते फक्त २८ ग्रॅम. दुसरा मुलगा ४५३ ग्रॅमचा होता. त्याची स्थितीही चांगली नव्हती. हृदयाला छिद्र होते. फुफ्फुस आणि मेंदूतून रक्तस्राव होत होता. त्याला २० वेळा रक्त देण्यात आले. तो सहा महिने मृत्यूशी झुंज देत होता. पण आईने हार मानली नाही, उपचार सुरूच ठेवले. आता हा मुलगा ऑली वर्षांचा झाला असून शाळेतही जात आहे.
बातम्या आणखी आहेत...