आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Died In Blast At Mosque On The Time Of Ramjan Prayer

रमजानच्या प्रार्थनेवेळी मशिदीत स्फोट; अरिहातील घट नेत २५ ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - सिरियातील एका मशिदीत रमजाननिमित्त प्रार्थनेच्या वेळी झालेल्या स्फोटात २५ ठार झाले. त्यात अल कायदाची साथीदार संघटना अल नुसराच्या कट्टरवादी एका म्होरक्याचाही समावेश आहे. काही नागरिकही त्यात ठार झाले. ही घटना अरिहा शहरात घडली.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता मानवी हक्क संघटनेकडून करण्यात आला आहे. घटनेत काही नागरिकही जखमी झाले आहेत. अरिहा शहरातील मशिदीत प्रार्थना सुरू असताना अचानक स्फोट झाला. मशिदीच्या आतमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
अल नुसरा संघटनेसह शेकडो नागरिक इफ्तारसाठी जमले होते. अरिहा शहर इडलिब प्रांतात येते. इडलिब प्रांतावर बंडखोर गटाचे वर्चस्व आहे. २०११ पासून सिरियात सुरू असलेल्या हिंसाचारात २ लाख ३० हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.