आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 year US Mortgage Baghdadi Had Used Sex Slave, Was Repeatedly Raped

26 वर्षीय अमेरिकन मुलीला बगदादीने केले \'सेक्स स्लेव्‍ह\'; आई-वडिलांचा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायला म्‍यूलर आणि बकदादी - Divya Marathi
कायला म्‍यूलर आणि बकदादी


बगदाद - अमेरिकेच्‍या मदत टीममध्‍ये असलेल्‍या 26 वर्षीय कायला म्‍यूलर या तरुणीचे 'आयएसआयएस' (इसिस) या कुख्‍यात दशतवादी संघटनेने अपहरण केले होते. दरम्‍यान, आयएसआयएसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी याने अनेक दिवस तिला 'सेक्स स्लेव्‍ह' बनवून तिच्‍यावर वारंवार बलात्‍कार केल्‍याचा खळबळजनक खुलासा म्‍यूलरच्‍या आई-वडिलांनी शुक्रवारी केला. कायला हिला सोडवण्‍यासाठी सैन्‍याने फेब्रुवारीमध्‍ये आयएसआयएसच्‍या तळांवर विमान हल्‍ले केले. यात कायला ही ठार झाल्‍याचे आयएसआयएसने सां‍गितले. पण, तिचा मृत्‍यू कसा झाला, हे अजूनही कोडेच आहे.
नेमके काय म्‍हणाले कायलाचे आई वडील
शुक्रवारी कायला हिचा 27 वा वाढदिवस होता. त्‍या अनुषंगाने तिचे आई-वडील कार्ल आणि मार्शा म्यूलर यांनी 'एबीसी चॅनल'ला मुलाखत देताना सांगितले, 3 ऑगस्‍ट 2013 रोजी दक्षिण टर्कीमधून तिचे इसिसने अपहरण केले होते. अपहरण काळात बगदादी याने आपल्‍या मुलीवर वारंवार बलात्‍कार केला. बगदादी हा कायला हिला स्‍वत:ची संपत्‍तीच समजत होता. त्‍याने तिचा सातत्‍याने छळ केला.

यजीदी मुलींनी दिली पुष्‍टी
कायलाला ज्‍या ठिकाणी कैदी म्‍हणून ठेवले होते तेथे 16 आणि 18 वर्षांच्‍या दोन याजीदी मुलीही होत्‍या. इसिसच्‍या तावडीतून पळून जाण्‍यास त्‍या दोघेही यशस्‍वी ठरल्‍या. कायला हिच्‍यावर बकदादी हा बलात्‍कार करत असल्‍याची पुष्‍टी त्‍यांनी केली. त्‍यांनी सांगितले, कायलाला हिचा आयएसआयएसचा दहशतवादी अबू सैयफ याच्‍या घरी ठेवले होते, अशी माहिती त्‍यांनी दिली. याला सैयफ याची पत्नी उम्म सैयफ हिनेही दुजोरा दिला आहे. उम्म ही सध्‍या अमेरिकेच्‍या ताब्‍यात आहे. बगदादी हा सैयफ याच्‍या घरी येऊन कायला हिच्‍यावर बलात्‍कार करत असल्‍याची माहिती तिने दिली.
लग्‍नसुद्धा झाले?
कायला हिने इसिसच्‍या एका सदस्‍यासोबत लग्‍न केल्‍याचा दावा काहींनी केला आहे. त्‍यांच्‍या दाव्‍यानुसार, कायलाच्‍या आई-वडिलांना तिची एक चिट्ठी मिळाली. त्‍यात लिहिलेले होते, कायला ही दहशवांद्याच्‍या कब्जात आणि सुरक्षित आहे. तिला चांगली वागणूक दिली जात असल्‍याचेही या चिठ्ठीत नमूद आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...