आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भारत-पाक फाळणी दरम्यान एकमेकांच्या जीवावर उठले होते लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहासाच्या गर्भात डोकावून बघितलं तर आढळून येईल की, 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी हिंदू-मुस्लिम लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. हजारो लोक मारले गेले आणि शकडो लोकांना घर सोडून जावे लागले. एका रिपोर्टनुसार जवळपास 2.5 कोटी लोकसंख्या फाळणीमुळे प्रभावित झाली होती.
एक अमेरिकी डॉक्युमेंट्री फोटोग्राफर त्या भयावह परिस्थितीची प्रत्यक्षदर्शी राहिली होती. मारग्रेट बुरके व्हाइटने त्या काळातील मन हेलावून टाकणारे अनेक फोटो आपल्या कॅमेर्यात कैद केले आहेत. या फोटोंमध्ये भारत-पाक फाळणीच्या वेदना स्पष्टपणे दिसून येतात. मारग्रेट बुरके ने केवळ पहिल्या वॉर फोटोजर्नलिस्ट होत्या तर 'लाइफ' मॅग्झीनच्यासुद्धा पहिल्या महिला फोटोग्राफर होत्या. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' कादंबरीमध्ये हे फोटो प्रकाशित झाले होते.

जाणकारांच्या माहितीनुसार, ब्रिटीश सरकारने फाळणीची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबावली नव्हती. देशामध्ये शांती आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी भारत आणि पाकिस्तानच्या नवीन सरकारी यंत्रणांवर आली होती. दोन्ही देशांच्या नवीन सरकारी यंत्रणेकडे या हिंसाचाराला रोखण्याची कोणतेही ठोस व्यवस्था नव्हती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 1947 मध्ये झालेल्या फाळणीचे भयावह वास्तव दाखवणारे फोटो...