आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत वादळ, पुरात २८ मृत्यूमुखी, टेक्सासमधील २४ जणांचा मृतांत समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डल्लास - अमेरिकेला वादळ आणि पुराचा तडाखा बसला असून त्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मृतांत २४ जण टेक्सासमधील आहेत. पुरामुळे अनेक महामार्ग उखडले असून पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसले आहे. त्यामुळे डल्लास भागातील घरांत पाणीच पाणी झाले आहे. दक्षिणेकडील राज्यांत ११ जण बेपत्ता असून देशभरातील मृतांचा आकडा २८ वर पोहोचला आहे. शनिवारी रात्री १७.८ सेंटिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
टोकाच्या हवामानाचा ठरला मे महिना
भारतात जीवघेणी उष्णतेची लाट आणि जगाच्या दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस आणि पूर असे चित्र यंदा मे महिन्यात पाहायला मिळाले. वायव्य प्रशांत प्रदेशात चक्रीवादळे येऊन गेली. पृथ्वीच्या पूर्वेला दुष्काळ होता. जगाच्या वेगवेगळ्या भागात टोकाचे हवामान होते. वास्तविक मे महिना हा जगात इतक्या टोकाच्या हवामानाचा नसतो, असे नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे तज्ज्ञ जेरी मिल यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...