आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसने मोसूलजवळ २३२ जणांची केली कत्तल, मृतांत १९० सैनिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा - इस्लामिकस्टेट या दहशतवादी संघटनेने मोसूलजवळ २३२ जणांचे शिर कलम केल्याची घटना घडली. इसिसने याच आठवड्यात हे कृत्य केले.

गेल्या बुधवारी २३२ नागरिकांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये इराकच्या सुरक्षा दलातील १९० जणांचा समावेश आहे, असा दावा संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आला आहे. हत्या करण्याची पद्धत पाहता हे कृत्य इसिसचे आहे, असे दिसते. दुसरीकडे इराकी फौजांच्या नेतृत्वाखाली मोसूल वर लष्करी कारवाईला सुरुवात झाली आहे. ही कारवाई सुरू झाली होती. त्याच दरम्यान ही हत्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इसिस विरोधी लष्करी कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा आहे. मोसूल भागातील अनेक जिल्ह्यांतील हजारो लोकांना इसिसने बळजबरीने स्थलांतरित केले होते. इसिसने मोसूलमध्ये हजार कुटुंबांचे अपहरण केले. त्यात स्री-पुरूष लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांना मानवी संरक्षण कवच बनवण्यात आले आहे.

कबरीतही शांतता नाही, दहशतीचे काळे ढग अजूनही दाटलेले...
कायारा- इराकमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने दोन वर्षांपूर्वी कायारा शहरातील कब्रस्तानातील कबरींनाही उद्ध्वस्त केले होते. गुरुवारी काही नातेवाइकांनी कब्रस्तानात आपल्या जिवलगाचे स्मृतिस्थळ शोधणे कठीण गेले. कारण इसिसने स्मृतिस्थळी असलेले नामफलकही नष्ट करून टाकले आहेत. गेली अनेक वर्षे इराक दहशतवादात होरपळून निघाले आहे. दुसरीकडे आठ दिवसांपासून मोसूलच्या दिशेने इराकी फौजांनी कूच केली आहे. मोसूलपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावरील कायारातील नागरिकांचा गहिवर कुणाच्याही काळजाला सहज भेदून जाणारा आहे.
बातम्या आणखी आहेत...