आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ईशनिंदेचे आरोपी ठरवून ISIS ने कापले तिघांचे शीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भर रस्त्यात शीर कापताना ISIS चे दहशतवादी. - Divya Marathi
भर रस्त्यात शीर कापताना ISIS चे दहशतवादी.
बगदाद/रक्का - इस्लामिक स्टेट (ISIS) च्या क्रौर्याची आणखी एक घटना समोर आली आहे. यात ISIS चे दहशतवादी इराकच्या एका शहरात खुलेआम तीन लोकांचे शीर कापण्यात आले आहे. या तिघांनी ईशनिंदा केल्याचा आरोप ISIS ने केला आहे.

फोटोत या व्यक्तिच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून हात मागच्या बाजुला बांधलेले दिसत आहे. चेहरा झाकलेल्या शस्त्रधारी दहशतवाद्यांनी त्याला चारही बाजुंनी घेरलेले आहे. त्यापैकी एकाच्या हातात मोठी तलवार असून तो या व्यक्तिचे शीर कापत असल्याचे दाखवण्यात आले आहे. इस्लामिक स्टेटच्या समर्थकांची गर्दीही फोटोत दिसत आहे. यात अनेक कमी वयाची मुले आहेत.

दरम्यान, सिरियाच्या रक्का शहरामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात ब्रिटीश ISIS दहशतवादी अबू अब्दुल्ला अल ब्रिटानी ठार झाला आहे. @Raqqa_Sl ट्विटर हँडलनुसार, गेल्या शनिवारी अब्दुल्ला कारमधून जात असताना ड्रोन हल्ल्याद्वारे त्याला लक्ष्य करण्यात आले. या अकाऊंटवर दहशतवाद्याचे काही फोटोही जारी करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षभरात ISIS ने सिरियामध्ये 3,000 पेक्षा अधिक लोकांची हत्या केली आहे. मानवाधिकार संघटना ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ च्या 29 जूनच्या रिपोर्टनुसार ISIS ने आतापर्यंत 3,027 लोकांची हत्या केली आहे. त्यात 1,787 नागरिक असून 74 लहान मुलांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...