आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 People Were Killed And 14 Wounded In An Shooting At Kansa

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, हल्लेखाेरासह चार ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस -अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. कन्सासमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार तर १४ जखमी झाले.पोलिसांनी कारवाईत बंदुकधाऱ्याचा खातमा केला. हार्वे काउंटीचे अधिकारी शेरिफ वाल्टन म्हणाले, लॉनचे गवत कापण्याची मशीन बनवणाऱ्या कारखान्यात गोळीबार झाला. बंदुकधारी इथेच काम करत होता. मात्र ही दहशतवादी घटना नाही.

हल्लेखोराने कारखान्यात पोहोचण्याआधी वाटेत ट्रकमध्ये एकाला गोळी मारली. नंतर एका कारचालकाला ठार मारून त्याची कार घेऊन तो कारखान्यात घुसला. तेथे त्याने अंदाधूंद गोळीबार केला. त्यात तिघाजणांचा मृत्यू झाला. कुणी तरी त्याची माहिती पोलिस स्टेशनला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोराचा खातमा केला. पोलिस येण्यास उशीर झाला असता तर मृतांची संख्या वाढली असती. पोलिसांनी हल्लेखोराची ओळ जाहीर केलेली नाही. परंतु एका वृत्तवाहिनीने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ३८ वर्षीय हल्लेखोराचे नाव सेड्रीक फोर्ड असे होते. पोलिस व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तो मनोरुग्ण वाटत नव्हता.