आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोराचा गोळीबार; इजिप्तमध्ये चौघे ठार, लष्कराची शोधमोहीम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - कारमधून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने खासगी वाहनांवर केलेल्या बेछूट गोळीबारात आज चार जणांचा मृत्यू झाला. यातील तीन जण पोलिस होते. ही घटना इजिप्तमधील उत्तर सिनाई प्रांतातील अल-मस्साद जिल्ह्यातील अल-आरीश शहरात घडली. लष्कराने लगेचच हल्लेखोराच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. त्यात त्यांनी एका संशयिताला अटक केली आणि अतिरेकी राहत असलेले एक घरच जमीनदोस्त केले. ज्यामधून एक गुप्त भुयार गाझा पट्टीकडे जात होते, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
कार चालवत असलेल्या हल्लेखोराने अचानक एका खासगी वाहनावर हल्ला केला, जी गाडी पोलिस चालवत होते. त्या गाडीतील सर्वच म्हणजे एक स्थानिक चालकदेखील गोळीबारात ठार झाला.
इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांचा मूळ प्रांत असलेल्या या भागात अनेक गैरकायद्याच्या टोळ्या कार्यरत असतात आणि हाच भाग अशा हल्ल्यांचा बळी ठरत आहे. हे हल्ले प्रामुख्याने पोलिस आणि लष्करालाच लक्ष्य करत आहेत. २०१३ मध्ये इस्लामिस्ट माजी अध्यक्ष मोहंमद मोर्शी हे सत्तेवर आल्यानंतरच हे हल्ले वाढत गेले. त्यांना त्यांच्या विरोधातील प्रचंड मोर्चांना तोंड द्यावे लागले होते. त्या वेळपासून आतापर्यंत ७०० वर सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...