आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदार्थाच्या नव्या, निराळ्या पैलूंच्या शोधाला नोबेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम - ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकेत संशोधन करणाऱ्या तीन वैज्ञानिकांना या वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. डेव्हिड जे. थूलेस(८२), एफ. डंकन एम. हाल्डेन(६५) आणि मायकल कोस्टरलिट्ज(७४)या तिघांच्या संशोधनाला नोबेल बहाल करण्यात येईल. मंगळवारी यांना पुरस्कार जाहीर झाले. यांनी पदार्थाची अज्ञात अवस्था समजून घेण्यासाठी जगाला नवे द्वार खुले केले आहे असे नोबेल समितीने म्हटले. अशा रहस्यमय स्थितीत तत्व अनेक रूपात अस्तित्वात असू शकते. या शोधामुळे नव्या घटकतत्वाच्या डिझायनिंगसाठी मोलाची मदत मिळणार आहे. यामुळे विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या वैज्ञानिकांनी गणिताची एक प्रगल्भ शाखा टोपोलॉजीचा वापर करत पदार्थाच्या अतिवाहकता (सुपरकंडक्टिव्हिटी), अतिद्रवता (सुपरफ्लूइडिटी) किंवा मॅग्नेटीक फिल्म्ससारख्या असामान्य पैलू किंवा अवस्थांचे अध्ययन केले. यांच्या शोधामुळे पदार्थाच्या अध्ययनाचे नवे आयाम खुले होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.१९७० च्या दशकात मायकल कोस्टरलिट््स आणि डेव्हीड थूलेस यांनी त्यावेळी प्रचलित ‘थिन करंट सिद्धांता’ला छेद दिला होता. त्या सिद्धांतानुसार पदार्थाच्या अत्यंत पातळ थरामध्ये सुपर कंडक्टिव्हिटी किंवा सुपरफ्यूइडिटी असण्याची शक्यता नाही. कमी तापमानात सुपर कंडक्टिव्हिटी असू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केले होते. या प्रक्रियेचे टप्पे त्यांनी प्रदर्शित केले होते. टोपोलॉजीच्या सिद्धांता आधारे पदार्थाच्या छोट्या-छोट्या चुंबकीय क्षेत्रांची श्रृंखला कशी समजून घेता येईल याचे ज्ञान हाल्डेनला झाले होते.

बेकरीपासून समजावली टोपोलॉजी : पुरस्कारची घोषणा करताना टोपोलॉजी काय आहे हे माध्यम प्रतिनिधींना समजावून सांगावे लागले. नोबेल समितीचे सदस्य थोर्स हँसन यांनी बेकरीमध्ये तयार केलेल्या बन, बेजेल(पेस्ट्री) आणि प्रित्झेल (स्विडीश खारी बिस्कीटे) दाखवून ही संकल्पना समजावली.

तिन्हीचे आकार व त्यातील रंध्रांची संख्या याच्या आधारे त्यांनी याचे महत्व आणि उपयोग सांगितला. त्याच्या चवीच्या आधारे त्यातील वेगळेपण त्यांनी विषद केले. डेव्हिड थुलेस यांना एकूण ८० लाख स्विडीश क्रोना(६.९४ कोटी रूपये)च्या ५०% रक्कम मिळेल. तर हाल्डेन आणि कोस्टरलिट्स यांना प्रत्येक एक चतुर्थांश रक्कम मिळेल.

कोण आहेत हे वैज्ञानिक
१९३४ मध्ये ब्रिटनच्या बेयर्सडन येथे थुलेस यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९५८ मध्ये न्यूयॉर्कच्या कॉर्नल विद्यापीठातून पीएचडी केली. ते सिएटलमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात मानद प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. १९५१ मध्ये लंडन येथे हाल्डेन यांचा जन्म झाला. त्यांनी १९७८ मध्ये कँब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली. अमेरिकेच्या प्रिंस्टन विद्यापीठात ते प्रोफेसर आहेत. कोस्टरलिट्स यांचा जन्म १९४२ मध्ये ब्रिटनच्या एबर्डीन येथे झाला. त्यांनी १९६९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. ते अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठात प्रोफेसर आहेत.
बातम्या आणखी आहेत...