आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जकार्ता हल्ल्याप्रकरणी तीन संशयितांना अटक, पुन्हा हल्ला होण्याचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाच्या राजधानीत गुरुवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. घटनास्थळाहून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा ध्वज जप्त करण्यात आला आहे.

सिरिया आणि इराकमधील अनेक प्रांतांवर ताबा असलेल्या आयएसने जगभरातून सुमारे ३० हजार परदेशी लढवय्ये तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात शेकडो इंडोनेशियन आणि मलेशियन असल्याचे सांगण्यात येते. जकार्तापासून काही अंतरावरील डेपोक शहरातून संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी स्टारबक्स कॅफे व वाहतूक पोलिस बूथवर सशस्त्र हल्ला झाला होता. गावठी बाँबसह बंदुका आणि आत्मघाती पट्ट्यांचाही वापर करण्यात आला होता. घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांत कॅनडा आणि इंडोनेशियन नागरिकांचा समावेश आहे. २० जण जखमी झाले.

संशयितांचे संबंध आयएसशी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मोठा गट पुढे येऊ शकतो.
बहरूम नईमचा हात?
जकार्ताचा रहिवासी बहरूम नईम हा सध्या आयएसकडून प्रशिक्षण घेण्यासाठी सिरियात आहे. जकार्तामधील दहशतवादी हल्ल्याचा कट त्याने रचला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सुरक्षेत मोठी वाढ
इंडोनेशियाच्या राजधानीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण इंडोनेशियात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी पोलिस स्थानके, सरकारी कार्यालये, राजदूत कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते.