आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवनिर्मित घटकांचा पृथ्वीवर ३० ट्रिलियन टनांचा भार, लिसेस्टर विद्यापीठातील संशोधकांचा शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पृथ्वीवर सध्या मानवनिर्मित घटकांचा ३० ट्रिलियन टन (पद्म टन) भार आहे. या सर्व वस्तूंना मानवी प्रगतीची प्रतीके मानण्यात येते. लेसिस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी या तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या वस्तूंवर संशोधन केले. टेक्नोस्पिअरच्या माध्यमातून या घटकांची माहिती सादर करण्यात आली. प्रोफेसर मार्क विल्यम्स यांनी या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले.

मानवनिर्मित वस्तूंवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यांचे उत्पादन व उपभोग ज्या गतीने वाढत आहे त्यावरही नियंत्रण ठेवण्यास सक्षम यंत्रणा अद्याप अस्तित्वात नसल्याचे संशोधक जान झालासिवेक्झ यांनी सांगितले. हवामानावर याचा परिणाम मोजण्यासाठी ‘अँथ्रोपोसेने’ नामक स्वतंत्र विद्याशाखा विकसित झाली आहे. मानवाने पृथ्वीमध्ये किती बदल केले आहेत याचा ताळेबंद या विद्याशाखेद्वारे मांडला जात आहे.

मानवनिर्मित घटकांमध्ये अविघटनशील घटकांचे वाढते प्रमाण पाहता वातावरण नष्ट होत आहे. आपण ‘अॅटमॉस्फियर’मधून ‘टेक्नोस्पिअर’ मध्ये स्थित्यंतरित होत आहोत, असे म्हणण्याइतके मानवनिर्मित घटकांचे प्रमाण वाढत आहे. या वस्तूंचे वस्तुमान ही समस्या नसून त्यामुळे पृथ्वीची उत्पादन क्षमता घटत आहे, ही मूळ समस्या संशोधकांनी व्यक्त केली. अत्याधुनिकतेच्या दिशेने होणारी वाटचाल कचऱ्याची निर्मिती करत आहे.

तांत्रिक जीवाश्मांचे वर्गीकरण करण्याची गरज संशोधकांनी केली व्यक्त
साध्या अवजारांपासून ते बॉलपेन, सीडी, नाणे निर्मिती अशा अनंत वस्तू सतत निर्माण होत असून पूर्वीच्या वस्तू उपयोगात असूनही टाकाऊमध्ये गणल्या जात आहेत, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले. याचा पुनर्वापरही तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाही. ‘हे तांत्रिक जीवाश्म’ काय परिणाम करतील याचे मोजमाप अद्याप तंतोतंत झालेले नाही. या तांत्रिक जीवाश्मांचे वर्गीकरण करून त्यावर संशोधन करणे सध्या काळाची गरज असल्याचे संशोधकांनी सांगितले.

या घटकांचा आहे समावेश
घर, इमारती, कारखाने, शेती, संगणक प्रणाली, स्मार्टफोन, सीडी, याशिवाय या निर्मितीदरम्यान पृथ्वीवर यांचा कचराही मोठ्या प्रमाणात साचला आहे. या सर्व घटकांचा वेध या संशोधनात घेण्यात आला. प्रत्येक स्क्वेअर मीटरमध्ये ५० किलो वस्तुमानाच्या वस्तू बसतील इतक्या प्रचंड प्रमाणात मानवनिर्मित घटक भूपृष्ठावर आहेत.
बातम्या आणखी आहेत...