आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगो रिपब्लिकमध्ये भारताचे 32 शांती सैनिक जखमी, स्फोटात एका मुलाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे शांती सैन्य गोमा जिल्ह्यातील एका गावात सर्च ऑपरेशनसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीला टार्गेट करण्यात आले. - Divya Marathi
भारताचे शांती सैन्य गोमा जिल्ह्यातील एका गावात सर्च ऑपरेशनसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीला टार्गेट करण्यात आले.
किंशासा - कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे 32 शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यूएन मिशनने म्हटले आहे, की कांगो येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. भारताचे शांती सैन्य गोमा जिल्ह्यातील एका गावात सर्च ऑपरेशनसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीला टार्गेट करण्यात आले.
- संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनमध्ये भारत 17 वर्षांपासून सहभागी आहे. या मोहिमेत आतापर्यंत 3263 सैनिकांना वीरमरण आले आहे. यात 157 भारतीय आहेत. यानंतर नायझेरियाचा क्रमांक लागतो. त्यांचे 142 सैनिक शहीद झाले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...