आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये नाईल नदीत बोट बुडाली, ३६ ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो: इजिप्तच्या नाईल नदीत प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उजेडात आली. त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. शनिवारी आणखी पाच मृतदेह आढळून आले.

मालवाहू जहाज आणि प्रवासी बोट यांच्यात टक्कर झाल्यानंतर प्रवासी बोट नाईल नदीत बुडाली. त्या अगोदर इजिप्तचे आरोग्य मंत्ऱ्यांनी मृतांचा आकडा ३३ असल्याचे सांगितले होते. परंतु नंतर मृतदेह आढळून आल्यानंतर तो वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्गोच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नाईल नदीत बोट बुडण्याच्या अनेक घटना घडतात. जलवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. दरम्यान, २००६ मध्ये मात्र देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना घडली होती. जहाज बुडून १ हजार जणांचा मृत्यू झाला होता.