आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी नौदल तळांवर हल्ला, चार सैनिक ठार, तीन गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी पुरावे शोधताना एफबीआयचे अधिकारी. - Divya Marathi
घटनास्थळी पुरावे शोधताना एफबीआयचे अधिकारी.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दोन नाैदल तळांवर शुक्रवारी एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात चार सैनिकांचा मृत्यू झाला. घटनेत एक पोलिस अधिकाऱ्यासह तीन जण जखमी झाले. ही घटना टेनेसी प्रांतातील चटनुगामध्ये घडली. गोळीबाराच्या घटनेने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे.
अमेरिकेचे नौदल राखीव केंद्र आणि दुसरे सैन्य भरती कार्यालय या ठिकाणांना बंदुकधाऱ्याने लक्ष्य केल्याची माहिती अमेरिकेचा संरक्षण विभाग पेन्टागॉनने दिली. मोहंम्मद युसूफ अब्दुल अजीज असे हल्लेखोराचे नाव होते. तो २४ वर्षांचा होता. बेछुट गोळीबारानंतर त्याने स्वत:ला देखील गोळी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार या नावाचा विद्यार्थी २०१२ मध्ये अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेत होते. त्याचा जन्म कुवैतमध्ये झाला होता.

आयएसचे आवाहन
सिरिया,इराकमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपल्या समर्थकांना रमझानच्या महिन्यात ‘लोन वुल्फ अटॅक अर्थात एकट्याने हल्ले करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा हल्ला झाला का, असा सवालही तपास अधिकाऱ्यांसमोर आहे.

एफबीआय गप्प
हल्लेखोर मोहंमद युसूफ अब्दुल अजीजच्या वडीलांची अगोदर एकदा चौकशी झाली होती. दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवल्यावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती. एफबीआयने ही चौकशी केली होती. परंतु ताज्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मात्र एफबीआयने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

पूर्वीही झाले हल्ले-
अमेरिकेच्यालष्करी तळांवर पूर्वीही अशा प्रकारचे हल्ले झाले होते. २००९ मध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नौदलाच्या भागात २०१३ मध्ये गोळीबार झाला होता. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हिंसाचार रोखण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर आहे.

दहशतवाद्यांचा हात ?
टेनेसीहल्ल्यामागे दहशतवादी हात अाहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. पेन्टागॉनने आपली चक्रे फिरवली आहेत. लवकरच त्याचे कारणही उजेडात येईल, असे सूत्रांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्पष्ट केले. आयएसच्या कारवाया अनेक देशांत सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...