आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ: ढिगार्‍याखालून 22 तासांनी चार महिन्यांच्या चिमुरड्याला जिंवत काढले बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: नेपाळच्या लष्कर जवानांनी 22 तासांनंतर ढिगार्‍यातून काढलेले बालक)

काठमांडू- नेपाळची राजधानी काठमांडूपासून पाच किलोमीटर अंतरावर भक्तपूरमध्ये सोमवारी (27 एप्रिल) 22 तासांनंतर ढिगार्‍याखालून चार महिन्यांच्या बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात नेपाळी सैन्याला यश मिळाले. सध्या या बालकावर भक्तपूर रूग्णालयात उपचार सुरु आहे.

25 एप्रिलला आलेल्या महाविनाशकारी भूंकपात नेपाळ उद्‍धवस्त झाले आहे. या भूकंपाने हजारों नागरिकांचा बळी घेतला असून लाखोंना बेघर केले आहे. बुधवारी पाचव्या दिवशीही ढिगारा उपसण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, विनाशकारी भूकंपानंतर नेपाळीमधील स्थितीची ताजी छायाचित्रे...

(साभार: काठमांडू टुडे)