आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भात होती जुळी मुले, आजारामुळे एकाचा मृत्यू; दुसऱ्याला वाचवण्यासाठी 4 महिने मृत मुलगा गर्भात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिव्‍हरसोबत एम्‍मा ड्युटॉन. - Divya Marathi
ऑलिव्‍हरसोबत एम्‍मा ड्युटॉन.
लंडन- ब्रिटनच्या एका आईने आपले मूल वाचवण्यासाठी दुसऱ्या मृत मुलाला चार महिने गर्भात ठेवले. दुसरे मूल जगात आले होते. ही कहाणी आता समोर आली आहे कारण पीडित आई आणि वडिलांनी अशा प्रकारच्या आजाराने पीडित मुलांसाठी मोहीम उघडली आहे.  

तुम्ही गर्भवती आहात, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर ३० वर्षीय एम्मा ड्युटॉन यांच्यासाठी ही आनंददायक बातमी होती. गर्भात जुळी मुले आहेत, हे माहीत झाल्यानंतर तर आनंद द्विगुणित झाला. पण मुलांना दुर्मिळ प्रकारच्या वैद्यकीय स्थितीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे दोघांच्या जिवाला धोका आहे हे काही दिवसांनी कळले. ट्विन टू ट्विन ट्रान्सफ्यूजन सिंड्रोम (टीटीटीएस) या स्थितीत एका मुलाच्या नाळेतून दुसऱ्या मुलात रक्त प्रवाहित होते, त्यामुळे जर एखाद्या मुलाला एखादा आजार असेल, तर दुसऱ्यालाही होऊ शकतो. २० आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर एका मुलाचा मृत्यू झाला. पण एम्माने दुसऱ्या मुलासाठी हे दु:ख सहन केले. आता तिच्यासमोर आणि डॉक्टरांसमोर दुसऱ्या मुलाला वाचवण्याचे आव्हान होते. त्यामुळे एम्माने मृत मुलाला गर्भातच ठेवण्याचा निर्णय घेतला. 

भलेही एका मुलाचा मृत्यू झालेला असो, पण दोघेही एकत्र जगात यावेत, अशी एम्माची इच्छा होती. त्याशिवाय दुसरे मूल चांगले राहावे यासाठीही मृत मूल गर्भातच राहणे आवश्यक होते. या जुळ्या मुलांची गर्भनाळ एकच होती. तिच्याशी कोणत्याही प्रकारे छेडछाड केल्यास जिवंत मुलाला गंभीर धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे एम्माने मृत मुलाला चार महिने गर्भात ठेवले. मुलाच्या जन्मानंतर एम्मा आणि पती मार्क प्रिन्स मृत मूल पाहून भावानविवश झाले. त्यांनी त्याचे नाव एलिजा ठेवले होते. जिवंत मुलाचे नाव ऑलिव्हर ठेवण्यात आले.  
 
 
बातम्या आणखी आहेत...