आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिला दहशतवाद्यांना बांगलादेशात अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेश पोलिसांनी सोमवारी जमात-उल- मुजाहिदीनच्या महिला दहशतवाद्यांना अटक केली. ढाक्यात कॅफेतील भीषण बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा दलांनी देशव्यापी शोधमोहीम हाती घेतली असून ही अटक हा त्याचाच एक भाग होता. भाड्याने घेतलेल्या घरात इस्लामच्या नावाखाली त्यांच्या दहशतवादी कारवायांना ते अंतिम रूप देत असत आणि तेथेच त्या जमात-उल-मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या महिला शाखेसाठी इतर महिलांची भरती करत असत, अशी माहिती सिराजगंजचे जिल्हा पोलिस अधीक्षक मिराझोद्दीन यांनी दिली.
घरावरील या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारुगोळा, बॉम्ब आदी साहित्यासह जिहादवरील पुस्तके, चार ग्रेनेड शेल आणि इलेक्ट्रिकल साहित्य उपकरणे जप्त केली. अटक केलेल्या चारही महिला विवाहित या वय १८ ते ३० वर्षांदरम्यानच्या आहेत. या चारही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. यापूर्वीही ऑगस्ट १६ रोजी गुन्हेगारविरोधी रॅपिड अॅक्शन बटालियनने एका खासगी अभिमत विद्यापीठातील तीन विद्यार्थिनींना पकडले होते. त्या ढाका मेडिकल कॉलेजच्या इंटर्न होत्या. त्यांचा जमात-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध होता. कॅफेवरील भीषण अतिरेकी हल्ल्यात त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. या दहशतवादी हल्ल्यात २२ जण ठार झाले होते. जमात-उल- मुजाहिदीन ही संघटना ही इसिसचीच शाखा मानली जाते.
बातम्या आणखी आहेत...