आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदानमध्ये विमान अपघातात 40 जणांचा मृत्यू, केवळ तिघे वाचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुबा - दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथून उड्डाण घेतल्यानंतर विमानाला अपघात झाला. व्हाइट नाईल नदीजवळ एका छोट्या बेटाजवळ हे विमान कोसळले.
या अपघातात बेटावरील शेतकरी समुदायातील काहींचा मृत्यू झाल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ८०० मीटर अंतरावरच कार्गो विमान अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त स्थानिक रेडिअोवरून देण्यात आले. यात ४० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने तीनच प्रवासी वाचल्याचे सांगितले आहे.
विमानाच्या भग्न भागांजवळ प्रवाशांचा शोध घेणे सुरू आहे. या विमानाचे अवशेष नदीच्या किनारी व जंगलात विखुरले अाहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...