रोम - भूमध्यसागरात मायग्रेंटस (प्रवासी) च्या एका जहाजामध्ये जीव गुदमरल्याने 40 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या नेव्हीने याबाबत माहिती दिली आहे. नेव्हीच्या मते या जहाजामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होती. इंजिनातून निघणाऱ्या धुरामुळे या लोकांचा जीव गुदमरला असण्याचा अंदाज लावला जात आहे. जहाजात असलेल्या इतर 300 जणांना लिबियाच्या किनाऱ्यावर वाचवण्यात आले.
इटलीच्या वृत्तसंस्थेने नेव्हीचे प्रवक्ते कोस्टनरिनो फंटासिया यांच्या हवाल्याने सांगितले की, जहाजामध्ये 350 प्रवासी होते. लिबियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात हा अपघात झाला. बहुधा जीव गुदरमल्याने 40 प्रवाशांनी प्राण गमावला असावा असेही ते म्हणाले. मात्र याबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मृतांचे मृतदेह जहाजाच्या तलाशी असलेले पाणी, डिझेल आणि मलमुत्रामध्ये पडलेले आढळले. इटलीच्या नेव्हीने सिगाला फुलगोसीमध्ये बचावकार्य केले आहे. उर्वरित प्रवाशांना इटलीच्या एका बंदरावर नेण्यात आले.
आधीही झाला होता अपघात
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार भूमध्यसागर पार करून युरोपला जाण्याच्या प्रयत्नात यंदा 2000 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारीही एक जहाज बुडाल्याने 50 प्रवासी बेपत्ता झाले होते. तर या महिन्यातच लिबियाच्या किनाऱ्याजवळ जहाज बुडाल्याने सुमारे 200 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. प्रवाशांसाठी भूमध्यसागर पार करणे हे अत्यंत जोखमीचे बनले आहे. आफ्रिका, मध्य पूर्व आशियाच्या काही देशांचे नागरिक युद्ध, गरीबी आणि इतर समस्यांनी त्रस्त होऊन लिबियाला येत आहेत. नोकरी आणि शरण मिळण्यासाठी ते लिबियामधून उत्तर युरोपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.
पुढील स्लाइड्वर पाहा, संबंधित PHOTOS