आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियाच्या समुद्रकिना-याजवळ जहाज बुडाले; ४०० जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम | लिबियाच्या समुद्रकिना-याजवळ जहाज बुडाल्याने ४०० प्रवाशांचा मृत्यू झाला. हे प्रवासी अवैध मार्गाने युरोपात शिरण्याच्या प्रयत्नात होते. या दुर्घटनेत बचावलेल्यांनी इटलीत आल्यावर ही माहिती दिली. ही घटना रविवारी घडली. बचावलेले प्रवासी मंगळवारी सकाळी सुमारे १५० लोक इटलीच्या रेगियो कालाब्रिया येथे पोहोचले.

द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयआेएम) व सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून ही माहिती देण्यात आली. ४०० मृतांमध्ये बहुसंख्य तरुण व अल्पवयीन असल्याचे सेव्ह द चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेने सांगितले आहे. यापूर्वी इटलीच्या तटरक्षक दलाने १४४ लोकांना सुरक्षित बाहेर काढल्याचा दावा केला होता. ९ मृतदेह समुद्रातून काढल्याचेही नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. जहाजात ५०० ते ५५० प्रवासी असल्याचे इटलीतील आश्रितांच्या हवाल्याने आयआेएमचे प्रवक्ते फ्लाविआे दि गिआकोमो यांनी सांगितले. लिबियाहून निघाल्यावर २४ तासांनी जहाज पलटले. बचावलेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. अपघातांच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे गिआकोमो म्हणाले.