आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इक्वेडोरचा भूकंप: 3 दिवस, 413 लोकांचा बळी, बचाव कार्य चालूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्टोव्हेजो - इक्वेडोरला शनिवारी (ता.16) बसलेल्या भूकंपात आतापर्यंत 413 लोकांचा बळी गेला आहे. हा आकडा वाढण्‍याची शक्यता आहे. कारण अद्याप कोसळलेल्या घरांचे ढिगारे उपसण्‍याचे काम सुरु आहे.भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्‍टर स्केल होती. सोमवारी (ता.18) देशाचे राष्‍ट्रपती रफायल कोरिआ यांनी भूकंपामुळे मोठी हानी झालेल्या भागाची पाहणी केली. इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादक देश आहे.
दशकातील सर्वात मोठी आपत्ती देशावर कोसळली असून देशाची पुनर्बांधणीसाठी अब्जावधी डॉलर लागतील, असे राष्‍ट्रपती म्हणाले. उद्ध्‍वस्त झालेले रस्ते आणि बंदरांमुळे केळी, फुले, कोका बिन्स आणि माशांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इक्वेडोरचा ऑंखो देखे हाल....