आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 44 Killed In Bomb Blast At Mosque And Restaurant In Nigerian City

नायजेरिया : मशिदीतील स्फोटात धर्मगुरूंसह ४४ ठार, रेस्तरॉमध्येही धमाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुजा - नायजेरियाच्या जोस शहरातील एक मशिदीसह रेस्तरॉमध्ये बॉम्बस्फोटांत ४४ जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री यांताये मशिदीत झालेल्या एका स्फोटात धर्मगुरु सानी याहया यांच्यासह 44 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नायजेरियामध्ये असलेल्या धार्मिक विविधतेबाबत धर्मगुरू प्रवचन देत असताना हा स्फोट झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याहया यांना लक्ष्य करुनच हा हल्ला करण्यात आला होता. या स्फोटानंतर काही अज्ञात बंदूकधार्‍यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पण तपास अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेमागे बोको हरमचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नायजेरियामध्ये सिरिया आणि इराकमध्ये धुमाकूळ घालणारी ISIS ही संघटनादेखिल नायजेरियातील दहशतवादी संघटना बोको हरमला मदत करत आहे.

दुसरा स्फोट एका रेस्तरॉमध्ये झाला. शेगालिंकू नावाच्या या रेस्तरॉमध्ये नेहमी नेतेमंडळी येत असतात. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने काही लोकांचा आरडाओरडा ऐकला. एका आत्मघातली हल्लेखोराने गर्दी असलेल्या रेस्तरॉमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हा स्फोट झाला. नॅशनल इमर्जंसी मॅनेजमेंट एजंसीचे अब्दुसल्लाम मोहम्मद यांनी सांगितले की, या स्फोटात एकूण 67 लोक जखमी झाले आहेत. त्याआधी योबे राज्यातील एका चर्चमध्ये झालेल्या स्फोटात पाच जण ठार झाले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, PHOTO