आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 45 Indians In Forbes List Of Achievers Under The Age Of 30

FORBES ची युवा यादी जाहीर, 45 भारतीय युवक-युवतींना मिळाले स्‍थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा शाह - Divya Marathi
करिश्मा शाह
न्‍यूयार्क - वयाच्‍या तिशीतच आपल्‍या कार्याचा वेगळा ठस्‍सा उमटवणाऱ्या जगातील 600 युवकांची यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली. यामध्‍ये 45 भारतीय युवकांना स्‍थान मिळाले. ‘फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत ‘फोर्ब्स’ने ही यादी जाहीर केली. त्‍यांना फोर्ब्सने गेम चेंजर असेही म्‍हटले.
किती युवकांना मिळाले स्‍थान
- ही फोर्ब्सची पंचवार्षिक यादी आहे. यात जगभरातील विविध क्षेत्रांमधील 600 युवकांना स्‍थान मिळाले आहे.
- हे युवक ग्राहक तंत्रज्ञान, शिक्षण, मीडिया, उत्पादन, उद्योग, कायदा आणि धोरण, विज्ञान आणि कला या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत.
- या बाबत फोर्ब्सने म्‍हटले, 'जर तुम्‍ही जग बदलवू इच्छित असाल आणि तुमचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असेल तर हे तुमच्‍या इच्‍छेला अनुकूल आहे.
कंज्यूमर टेक सेगमेंटच्‍या यादीत रितेश अग्रवाल आणि बियाणी
- OYO रूम्सचे सीईओ आणि संस्‍थापक रितेश अग्रवाल यांना या सेगमेंटमध्‍ये स्‍थान मिळाले आहे.
- रितेशचे वय केवळ 22 वर्षे आहे. भारतातील 100 पेक्षा अधिक शहरांत त्‍याने 2 हजार 200 छोट्या-छोट्या हॉटेलचे नेटवर्क तयार केले.
- Sprig चे संस्‍थापक असलेले 28 वर्षीय गगन बियाणी आणि नीरज बेरी यांनाही या यादीत स्‍थान मिळाले आहे.
- या दोघांनी असे मोबाइल अॅप बनवले की, त्‍याच्‍या माध्‍यमातून हेल्दी फूडची लवकारात लवकर डिलिव्‍हरी करणाऱ्या दुकानांची माहिती मिळते.
- Google X च्‍या 25 वर्षीय करिश्मा शाह हिलासुद्धा या यादीत स्‍थान मिळाले.
उद्योग क्षेत्रात नीला दास आणि दिव्या नेत्तिमींना जागा
- 27 वर्षीय नीला सिटी ग्रुपमध्‍ये उपाध्‍यक्ष आहे. ती मोर्टगेज बॉन्ड ट्रेडिंगचे काम पाहते.
- 29 वर्षीय दिव्या विकिंग ग्लोबल इन्वेस्टर्समध्‍ये गुंतवणूक सल्‍लागार आहे.
- 29 वर्षीय विकास पटेल हेज फंड मिलेनियम मॅनेजमेंटमध्‍ये वरिष्‍ठ सल्‍लागार आहे.
- 29 वर्षीय नील राय कॅक्सटन एसोसिएट्समध्‍ये इन्वेस्टमेंट एनालिस्ट आहे.
हॉलीवुड आणि मनोरंजनातून लिली सिंह
- 27 वर्षीय कॅनेडियन आर्टिस्ट लिली सिंह राइटर आणि कॉमेडियन आहे. ती मूळ भारतीय आहे.
- तिने यूट्यूबचा चांगला वापर केल्‍याचे फोर्ब्सने म्‍हटले.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...